शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या चौघांचा मृत्यू

By admin | Updated: April 15, 2017 03:49 IST

कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यात कार कोसळल्याने या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.

पाटस / शिरसगाव काटा : कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यात कार कोसळल्याने या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. नंदा दीपक गायकवाड (रा. मांडवगण, ता. शिरुर), नवनाथ हरिभाऊ पवार, प्रतिभा नवनाथ पवार, आबासो प्रल्हाद जठार (तिघेही रा. सादलगाव, ता. शिरुर) या चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरुर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. वरील चौघेही कारने (एमएच १२ एलडी ६७२0) दौंडहून कानगावमार्गे मांडवगण फराटा येथे निघाले होते. दौंड येथील एका रुग्णालयातून एका महिलेवर उपचार घेऊन कारमधून जात असताना त्यांच्यावर कानगाव बंधाऱ्याच्या परिसरात काळाने झडप घातली. दरम्यान ही कार कानगाव (ता. दौंड) हद्दीतील भीमा नदीवरील बंधाऱ्याचा रस्ता सुरु होण्याच्या अलीकडच्या रस्त्यावरुन घसरली आणि ती पलट्या मारत थेट बंधाऱ्यातील पाण्यात कोसळली. ही घटना बंधाऱ्याच्या परिसरातील काही लोकांनी बघितली. या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने कानगाव-मांडवगण परिसरातील ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. बंधाऱ्याच्या परिसरात मांडवगण-कानगाव पुलाचे काम सुरु आहे. या कामासाठी क्रेन होती. या क्रेनच्या सहाय्याने बंधाऱ्यात पडलेल्या कारला सुमारे अर्ध्या तासानंतर काढण्यात आले. तोपर्यंत कारमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. चारही मृत व्यक्तींना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)