शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण गोळीबार प्रकरणातील एकाचा मृत्यू

By admin | Updated: September 29, 2015 02:20 IST

वाळू व्यवसायातील वादातून झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या तरुणावर पुणे

भिगवण : वाळू व्यवसायातील वादातून झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या तरुणावर पुणे शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. भिगवण येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोर पुणे शहरातील आहेत. संशयित तिघा हल्लेखोरांना याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाल करीत गोळीबार झालेल्या दिवशीच रात्री साडेअकरा वाजता तिघा जणांना अटक केली आहे.या घटनेतील गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विनोद गुणवंत बंडगर (वय ३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेंद्र नानासाहेब जगताप याच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. राहू (ता. दौंड) येथील गोळीबाराची घटना ताजी असताना भिगवण येथे हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे भिगवण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलल्याने स्थिती नियंत्रणात आहे. अद्यापदेखील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. वाळू व्यावसायिक आणि वाहतूकदार यांच्यातील पावती रकमेवरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान गोळीबारात झाले. त्यातून एका तरुणाला हकनाक आपला जीव गमवावा लागला. याबाबतची फिर्याद गुणवंत शंकर बंडगर यांनी दिली आहे.गोळीबारप्रकरणी आरोपी पृथ्वीराज ऊर्फ चिक्या संजय तनपुरे, मनीष विजय तनपुरे (दोघेही वय २१, रा. सर्व जण बालाजीनगर, पुणे ४३), शरद बबन चौरे (वय ३२, रा. आंबेगाव, पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी संजय तनपुरे साथीदारांसह फरारी आहे. दरम्यान, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विनोद बंडगर याच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)