Pune | डोक्यावरून गेले कंटेनरचे चाक, जेष्ठाचा जागेवरच मृत्यू; नीरा येथे भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:39 IST2023-03-10T18:33:37+5:302023-03-10T18:39:29+5:30
मोटासायकलस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू...

Pune | डोक्यावरून गेले कंटेनरचे चाक, जेष्ठाचा जागेवरच मृत्यू; नीरा येथे भीषण अपघात
नीरा (पुणे) : नीरा (ता.पुरंदर) येथे असलेल्या नीरा नदीच्या पुलावर झालेल्या कंटेनर आणि मोटारसायकलच्या अपघातात पाडेगाव येथील एकाचा मृत्यू झाला आहे. मोटासायकलस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अशोक रघुनाथ भोसले (वय ६५) अस या मृत व्यक्तीचं नाव आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाडेगाव येथील आंबेडकर सोसायटी येथील राहणारे अशोक रघुनाथ भोसले हे नीराकडे येत होते. त्यावेळी लोणंद कडून एक कंटेनर येत होता. कंटेनर मोटार सायकलला ओव्हरटेक करीत असताना मोटार सायकलला धक्का लागला. त्यामुळे भोसले यांची मोटरसायकल पडली. यावेळी भोसले देखील खाली पडले त्यांचे डोके कंटेनरच्या चाकाखाली गेले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. लोणंद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासणीसाठी लोणंद येथे पाठवण्यात आला.
पोलिसांच्या हद्दीच्या वादात मृतदेह एक तास रस्त्यावर-
नीरा नदी ही नीरा शहाराजवळून जात असली तरी या नदीचा बराचसा भाग हा सातारा जिल्ह्यात येतो. या पुलावर अपघात झाल्यास पोलिसांमध्ये हद्दीवरून नेहमीच वाद होत असतात. आजही लोणंद पोलीस आणि नीरा पोलिसांचा वाद पाहायला मिळाला. त्यामुळे मृतदेह एक तास रस्त्यावर होता. तर त्यामुळे वाहतुकीचा ही खोळंबा झाला होता.