जुन्नर तालुक्यातील अनंत पतसंस्थेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:57 IST2021-11-24T15:18:10+5:302021-11-24T15:57:36+5:30

चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Daytime armed robbery at Junnar's Infinite Credit Union Manager killed in shooting | जुन्नर तालुक्यातील अनंत पतसंस्थेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील अनंत पतसंस्थेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू

वडगाव कांदळी : जुन्नर तालुकयातील 14 नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की ,१४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्ग लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला. व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. यामध्ये भोर यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत घटनास्थळी पोलीस आणि श्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

Web Title: Daytime armed robbery at Junnar's Infinite Credit Union Manager killed in shooting