शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दौंडचा जुना धोकादायक रेल्वेपूल पाडण्यास सुरुवात

By admin | Updated: June 29, 2015 23:37 IST

दौंड रेल्वे स्थानकातील धोकादायक जुना पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. सदरचा पूल धोकादायक असून हा पूल केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते.

दौंड : दौंड रेल्वे स्थानकातील धोकादायक जुना पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. सदरचा पूल धोकादायक असून हा पूल केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते. या आशयाचे वृत्त लोकमतने ५ जून रोजी दिले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा पूल काढण्याच्या हालचालींना सुरुवात केली. त्यानुसार सोमवार (दि.२९) रोजी हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे. हा पूल प्रवाशांच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी सोईचा होता. मात्र अलिकडच्या काळात हा पूल धोकादायक झाला होता. तसेच सदरचाा पूल रहदारीसाठी धोकेदायक असल्याचा सूचना फलक गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने लावला होता. मात्र सोईसाठी प्रवाशी या पूलावरुन ये जा करीत होते. नव्याने उभारलेला उंच पूल हा प्रवाशांसाठी गैरसोयीचा होता. या पूलाला ५२ पायऱ्या आहेत. (वार्ताहर)संपूर्ण पूल गंजला होता-जुना पूला हा धोकादायक होताच हा पूल पाडत असताना पूलाच्या पायऱ्या आणि खांब पूर्णपणे गंजलेले होते. तर काही ठिकाणी हा पूल झिजलेला असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळ वला असता, परिणामी पूल काढल्यामुळे धोका टळला असून प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपूर्वी पावसाळ््यात या पूलाला विद्युत तारांच्या तांत्रिक बिघाडामुळे पूलात विद्युत प्रवाह सुरु झाला होता. मात्र रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या सत्कतेमुळे धोका टळला, रेल्वे कर्मचारी, पोलीस, रेल्वे सुरक्षाबल यांनी पूलाला वेढा दिल्याने अनर्थ टळला. दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर हा पूल कार्यरत झाला होता.अडचणीत अडचण प्रवाशांच्या सोईसाठी नवीन पुलाला लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहे. त्यामुळे लिफ्टद्वारे प्रवाशी या पूलावरुन ये जा करु लागले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत एक लिफ्ट बंद असल्याने प्रवाशांना नवीन पूलाच्या पायऱ्या चढून जावे लागत आहे. त्यातच जुना पूल पाडल्याने आता नवीन पूलावर प्रवाशांची दमछाक सुरु झाली आहे. त्यामुळे अडचणीत अडचण, निर्माण झाली असल्याने सदरची लिफ्ट तातडीने सुरु करावी, की जेणे करुन प्रवाशांची दमछाक थांबेल, अशी मागणी प्रवाशी वर्गातून पुढे आली आहे.