daughter Ankita loss due to Harshvardhan Patil's BJP entry | हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला

हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला

ठळक मुद्देकारकीर्दीच्या सुरवातीलाच राजकारणाचा बळी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरकाँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, राष्ट्रवादीची छुपी साथ

- निनाद देशमुख

पुणे : लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करूनही हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरची जागा सोडण्यास तयार नव्हते. यामुळे काँग्रेस अस्वस्थ असलेले पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या.  उद्या (दि ११) त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्या भाजपप्रवेशाचा फटका नुकत्याच राजकारणात पदार्पण केलेल्या त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना बसला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेच्या निवडणूकीत काँग्रेसनेच त्यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी राजकारणाला कंटाळून माघार घेतली. 
    लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापुर तालुक्यातून मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने इंदापुरची जागा काँग्रेसला सोडावी असे ठरले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली. यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य तालुक्यातून मिळाले.  मात्र, विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम वाजताच राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता वाढली होती. पुस्तक प्रकाशाच्या निमित्ताने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने भाजपच्या मेगाभरतीत हर्षवर्धन पाटील हे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यांच्या या चचेर्मुळे काँग्रेसमधूनही गटबाजीला त्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान, त्यांचे मनवळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, इंदापुरच्या जागेबाबत शेवटपर्यंत अस्पष्टता कायम राहिल्याने इंदापुरच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. वडीलांच्या राजकरणाचा फटका मात्र, नव्याने राजकारणात पदार्पण करणा-या त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना बसला. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेच्या सदस्या होत्या. त्यांच्या निधनामुळे जिल्हा परिषदेची बावडा गटाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेवर अंकिता पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली.  त्यांना सर्वपक्षांनी पाठिंबा देत कुठलाही उमेदवार उभा केला नाही. सहानुभूतीमुळे ही जागा बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या विरोधात तब्बल ८ अपक्ष उमेदवार उभे राहिले. या निवडणूकीपासूनच त्यांना राजकारणाला सामोरे जावे लागले. या जागेवर मोठ्या मताधिक्याने त्या निवडणूक आल्या. जिल्हापषिदेच्या माध्यमातून महिला तसेच मुलींचे प्रश्न मांडण्याचा मानस होता. त्यांच्या आजी या स्थायी समितीच्या सदस्य असल्याने त्यांनाही ती जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असल्यामुळे काँग्रेसमधूनच अतंर्गत राजकारणाला त्यांना सामोरे जावे लागले. 
   जिल्हा परिषदेची स्थायी समितीची निवडणूक ही २२ ऑगस्टला नियोजित होती. मात्र, निवडणूकीच्या आदल्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्यात. काँगेसचे सदस्य दत्ता झुरंगे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी तातडीने कृषी समितीचा राजीनामा द्यायला सांगत स्थायी समितीसाठी अर्ज भरण्यास सांगितला. कृषी सभापती यांनी तो तातडीने मंजुरही केला.  पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या एका जागेसाठी प्रदेश काँग्रेसने अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची शिफारस केली. मात्र, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दुस-याच सदस्याचे नाव पुढे केल्याने सर्वसाधारण सभेत काँग्रेसमध्ये दोन गट पडले. काँग्रेसच्या सदस्यांमध्ये एकमत न झाल्यानेच अखेर आचारसंहितेपूवीर्ची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ प्रशासनावर आली. या नाट्यमय घडामोडी घडविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती.  आपल्या राजकीय जिवनाच्या सुरूवातीलाच वाईट राजकारणाला सामोरे जावे लागल्याने अंकिता पाटील नाराज झाल्या होत्या. यामुळे माघार घेण्याच्या तयारीत त्या होत्या. मात्र, काहींनी त्यांची समजुत काढली. दरम्यानच्या काळात हर्षवर्धन पाटीळ यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नव्हते.
   अखेर तहकुब झालेली सभा सोमवारी घेण्यात आली. या सभेपूर्वी तोडगा निघने अपेक्षित होते. मात्र, तो निघाला नाही. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध ठरल्याने माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. दरम्यान, झुरंगे यांनी माघार घेण्यासाठी अनेकांनी मनधरणी केली. मात्र, सामान्य घरातील कार्यकर्ता असल्याने आणि जिल्हाध्यक्षाच्या आदेशामुळे मागे हटण्यास त्यांनी नकार दिला. जांना राजकीय पाश्वभूमी आहे त्यांनीच माघार घ्यावी असा पावित्रा त्यांनी घेतला. यावेळी अंकिता यांना काँगे्रसचा विरोध असल्याचे स्पष्ट दिसले. अखेर सभागृहातील गोंधळामुळे अंकिता यांनी नाराजी व्यक्त करत आपला अर्ज मागे घेतला.
................
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, राष्ट्रवादीची छुपी साथ
हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेमुळे  स्थायी समितीची जागा अंकिता पाटील यांना सोडण्यास तयार नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँर्ग्रसच्या काही स्थायीक नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठी रातोरात उमेदवार उभा केला. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिसले. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच दिवशी वडिलांविरोधाच्या राजकारणाचा फटका अंकि ता यांना बसला. 

Web Title: daughter Ankita loss due to Harshvardhan Patil's BJP entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.