शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भंगाराच्या गोदामाला भीषण आग

By admin | Updated: April 28, 2017 05:52 IST

जेजुरी-सासवड मार्गावर भर मध्यवस्तीत असलेल्या भंगार गोदामाला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भीषण आग लागून लाखो

जेजुरी : जेजुरी-सासवड मार्गावर भर मध्यवस्तीत असलेल्या भंगार गोदामाला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल खाक झाला. जेजुरी नगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन, नगरसेवक, ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. गेल्या कित्येक वषार्पासून या ठिकाणी दोन एकराच्या जागेमध्ये हे गोदाम असुन या ठिकाणी पुणे जिह्यातुन भंगार माल आणला जात होता. आज दुपारी बारा वाजण्याच्या आजुबाजुच्या परिसरातील रहिवाशांना या भंगारच्या गोदामामधुन मोठ्या प्रमाणात धुर येत असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिस स्टेशन व नगरपालिकेशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच तत्काळ जेजुरी स.पो.निरिक्षक रामदास वाकोडे व नगरपालिकेचे कर्मचार्यां्सह मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य जगताप, महेश दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेजुरी पालिकेचे दोन बंब, सासवड नगरपालिका, निरा, बारामती, सोमेश्वर, पुणे आदी ठिकाणाहून अग्निशामक दलाचे आठ बंब मागवण्यात आले. या गोदामाच्या शेजारी भारत पेट्रोलियमचा पंप तर आजुबाजुला नागरी वस्ती, गुरांचा गोठा असल्याने सर्वांचीच धावपळ झाली. नगरपालिका कर्मचार्यांननी पोलिसांच्या मदतीने येथील नागरिकांना व गुरांना सुरक्षित ठिकाणी हालवून घरांतील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या गोदामामध्ये केमिकल व रसायनांचे रिकामे झालेले लोखंडी व प्लॅस्टिकचे कॅन, बॅरल आगीच्या भक्षस्थानी आल्याने त्याचे मोठे स्फोट होत होते. जेसीबीच्या सहाय्याने गोडावूनच्या संरक्षक भिंती पाडून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता करुन बंब आगीच्या ठिकाणी आणण्यात आले. गोदामाला लागूनच पन्नास फुटांवर पेट्रोलपंप असलल्याने तेथे विशेष दक्षता घेण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी प्रांत अधिकारी संजय असवले, तहसिलदार सचिन गिरी, नायब तहसिलदार संजय काटकर, बारामती उपविभागाचे अतिरिक्त अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलिस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील, स.पो.निरीक्षक रामदास वाकोडे, उप निरिक्षक गणेश पिंगुवाले, श्रीकांत देव, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण,जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भुमकर आदी अधिकारी आग विझेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. नगरसेवक सचिन सोनवणे,अजिंक्य देशमुख,सामाजिक कार्यकर्ते दादा मुलाणी, माजी नगरसेवक सुधीर गोडसे, हेमंत सोनवणे व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.