शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची दहशत

By admin | Updated: March 7, 2015 22:50 IST

वन विभागांतर्गत येणाऱ्या मांदारणे गावातील साबरवाडीत रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले.

मढ : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. काल (दि. ६) ओतूर वन विभागांतर्गत येणाऱ्या मांदारणे गावातील साबरवाडीत रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेऊन पुढील उपचारांसाठी पुण्यातील वाय.सी.एम. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.याबाबत उदापूरचे वनरक्षक एस.जी. मोमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साबरवाडीतील नेहा लक्ष्मण काळे ही रात्री घरातून लघुशंकेसाठी बाहेर आली. त्या वेळी तिच्याबरोबर पाळीव कुत्राही होता. समोरून आलेल्या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, कुत्रा पळाला व बिबट्याचा पंजा नेहाला लागला. त्यानंतर घरच्यांनी व साबरवाडीतील नागरिकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात आणले. तिला उपचारासाठी ओतूर येथे आणत आहोत, अशी माहिती मांदारण्याचे माजी सरपंच देवराम भले यांना फोनवरून मिळाली. त्यानुसर नेहाला ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान व सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु, त्यांना बिबट्याचा मार्ग सापडला नाही. या घटनेमुळे डिंगोरे, उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, सारणी या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाड्यावस्त्यांवर संध्याकाळनंतर अघोषित संचारबंदीच लागल्याची परिस्थिती आहे. बिबट्याला पकडण्याची तयारी वनविभागाकडून सुरू झाली आहे. (वार्ताहर)४आतापर्यंत बिबट्याने परिसरात दि. २२ जानेवारीला अहिनवेवाडी येथील गोटी शिवार येथे सुनीता गणेश महाकाळ, दि. २९ जानेवारीला उदापूर-मांदारणे मार्गावर बाळासाहेब बबन महाकाळ, दि. १२ फेबु्रवारीला ढमालेमळा मार्गावर शीतल गणेश जगताप, तसेच दि. २३ फेबु्रवारीला निर्मला शिवाजी पारधी यांना गंभीर जखमी केले आहे. डिंगोरे येथील मराडवाडीच्या ओढ्यात एक मृत बिबट्या आढळला होता. दि. १३ फेब्रुवारीला ढमालेमळा येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात एका बिबट्याची मादी जेरबंद झाली. याच काळात दि. २६ फेबु्रवारीला रात्री आठ ते नऊच्या दरम्यान उदापूरला बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून एक ठार तर एक उचलून नेली आहे.४ वन विभागाकडून परिसरात जनजागृती अभियान राबविले जात आहे. बिबट्याविषयी माहितीफलक, वन्यजीव अभ्यासकांची व्याख्याने, विविध ठिकाणी पिंजरे लावणे, पाहणी करणे, जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे इत्यादी कामे सुरूआहेत.