शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील दैनंदिन रुग्णसंख्या ३०० च्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:09 IST

बारामती: शहर आणि तालुक्यातील सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. रुग्णसंख्येने आता ३०० चा टप्पा ...

बारामती: शहर आणि तालुक्यातील सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. रुग्णसंख्येने आता ३०० चा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे सुपर स्प्रेडरचा कसून शोध घेण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. ९) झालेल्या आढावा बैठकिमध्ये सुपर स्प्रेडरची गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक झाले आहे.

बारामतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी घेतलेल्या ९२२ नमुण्यांमध्ये २१६ नव्याने संंक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४४ नमुने प्रतीक्षेत आहेत. बारामतीची एकूण रुग्णसंख्या ११ हजार ७३५ झाली असून आतापर्यंत ९ हजार ३३५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय असतानाच तालुका व शहरामध्ये सुपर स्प्रेडर शोधणे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये अनेक रुग्ण लक्षणेविरहित, तर सौम्य लक्षणे असणारे आहे. त्यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येत असल्याने रुग्णसंख्याही वाढीला लागली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सुपर स्प्रेडर शोधणे गरजेचे आहे. दरम्यान, संक्रमित होणाऱ्या तसेच गंभीर लक्षणे असणाऱ्या अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून बारामतीत रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ही बाब समजताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी तब्बल ४८० रेमडेसिविर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले होते. मात्र, अवघ्या दोन तासात ही इंजेक्शन संपल्याने पुन्हा एकदा बारामतीमध्ये रुग्ण आणि नातेवाईक हतबल झाले आहेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून सदर इंजेक्शन गरजूंना मोफत वाटप करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बारामती शहरातील कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. मात्र मागील चार दिवसांपासून इंजेक्शनचा मोठा तुटवडा असल्याने कोरोना रुग्णांचे नातेवाईक शहरातील खासगी रुग्णालयाच्या मेडिकल बाहेर मागील तीन दिवसांपासून सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत रांगेत उभे आहेत. यावर काल शनिवार (दि. १०) साधारण रुग्णांचे नातेवाईकांनी वैतागून प्रांताधिकाऱ्यांना भेटायला गेले. यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी त्यांची अडचण ऐकून घेतली. कोणी जर इंजेक्शनचा काळा बाजार करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू असे सांगितले.

नागरिक मागील तीन दिवसांपासून इंजेक्शन मिळेल या आशेवर मेडिकल बाहेर रांगा लावत आहेत. गंभीर असलेल्या काही रुग्णांची प्रकृती ढासळत आहे. मेडिकल बाहेर कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी होत असून याचा इतरांना मोठा धोका होऊ शकतो.

--------------------------

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून मिळालेल्या ४८० रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले होते. गरजू रुग्णांना त्याचे कालच वाटप करण्यात आले. गरजू कोरोना रुग्णांना रुग्णालयातच रेमडेसिविर उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या निगराणीखालील समिती त्यावर नियंत्रण ठेवणार आहे.

- किरण गुजर

ज्येष्ठ नगरसेवक

फोटो

वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये शुकशुकाट होता.