शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

सायकल मार्गात अडथळ्यांची शर्यत !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 4:25 AM

सायकल मार्गांचे अस्तित्वच धोक्यात : खड्डे, पार्किंग, भाजीविक्रेते, राडारोडा, पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : ‘सायकलींचे शहर’ म्हणून असलेली ओळख परत मिळविण्यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात मोठ्या प्रमाणात सायकल मार्ग बांधण्यात आले. परंतु, सध्या या सायकल मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून जागोजागी पडलेले खड्डे, रिक्षा, दुचाकी पार्किंग, भाजी विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी अतिक्रमण करून व्यापलेले सायकल मार्ग, महापालिकेच्या वतीने पदपथाचे काम करताना टाकलेला राडारोडा, लहान-मोठ्या टपऱ्या, टूव्हीलर सर्व्हिस सेंटर असे एक ना अनेक प्रकारचे अडथळे सध्या शहरातील सर्वच सायकल मार्गांवर झाल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.स्मार्ट सिटी व पुणे महापालिकेच्या वतीने शहरामध्ये ‘पब्लिक बायसिकल’ योजना सुरू करण्यात आली असून, त्याअतंर्गत सध्या शहरामध्ये हजारो सायकली विविध खासगी कंपन्यांनी नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, सध्या शहरातील प्रचंड वाहतूककोंडी आणि अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांची झालेली प्रचंड दुरवस्था यांमुळे पुणेकरांकडून या सायकल योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’च्या वतीने शहरातील काही सायकल मार्गांची पाहणी केली असता वरील वस्तुस्थिती समोर आली.शहरात जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत सन २००९नंतर मोठ्या प्रमाणात सायकल मार्ग बांधण्यात आले. सध्या शहरातील प्रमुख १४ ते १५ रस्त्यांवर सुमारे ५७ किलोमीटरचे सायकल मार्ग अस्तित्वात आहेत. हे सायकल मार्ग करण्यासाठी महापालिकेने १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.या १४-१५ रस्त्यांवर गेल्या १० वर्षांत रस्त्यांची विविध कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी पूल बांधण्यात आले, काही ठिकाणी भुयारी मार्ग तर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेले पदपथ, बीआरटी मार्ग यांमध्येदेखील अनेक सायकल मार्गांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक सर्व मार्ग विविध अडथळ्यांमुळे बंद पडले असल्याची वस्तुस्थिती आहे.‘सायकल धोरण’ कागदावरचमहापालिकेच्या वतीने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून एका खासगी कंपनीकडून शहराचे ‘सायकल धोरण’ तयार करून घेण्यात आले. या धोरणात सध्या अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांची दुरुस्ती करून बंद पडलेले मार्ग वापराखाली आणणे, नव्याने उत्तम सायकल ट्रॅक तयार करणे, रस्त्यावर स्वतंत्र सायकल लेन आखणे, सायकल पार्कसाठी जागा उपलब्ध करून देणे आदी विविध कामांचा सामावेश आहे. यासाठी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकामध्ये ५५ कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. परंतु, सध्या तरी सायकल धोरण कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.अतिक्रमण, बंद पडलेले व दुरवस्था झालेले मार्गसिंहगड रस्ता, पौड रस्ता ते चांदणी चौक, कर्वे रस्ता-पौड फाटा, पुणे स्टेशन ते फित्झगेराल्ड पूल, गणेशखिंड रस्ता-संचेती रुग्णालय रस्ता, संगमवाडी पूल ते सादलबाबा चौक, येरवडा, बॉम्बे सॅपर्स, विश्रांतवाडी, डेक्कन कॉलेज ते बॉम्बे सॅपर्स, हॉटेल ग्रीन पार्क ते बालेवाडी, नगर रस्ता-खराडी नाला आदी विविध मार्ग बंद पडले आहेत.सायकलसाठी प्रचंड काम करावे लागणारपुण्याची खूप वर्षांपूर्वी असलेली ‘सायकलींचं शहर’ ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रचंड काम करावे लागेल. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण शहरात सायकल ट्रॅक, सायकल लेन तयार करणे, प्रत्यक्ष सायकली उपलब्ध करून देणे, नियमांची कडक अंमलबजावणी करणे आणि नागरिकांची मानसिकता बदलणे, असे विविध पातळीवर एकाच वेळी प्रचंड काम करावे लागले.-राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूक