शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; शहरातील वेगवगेळ्या ४ घटनांमध्ये चौघांना ४३ लाखांना फसवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 19:01 IST

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे

पुणे: सायबर चोरांनी वेगवेगळ्या चार घटनांमध्ये चौघांची ४३ लाख १७ हजार ६४८ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत सायबर चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवणे परिसरातील ३५ वर्षीय तरुणाला १ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सायबर चोरांनी संपर्क साधून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा कमवू शकता, असे आमिष दाखवले. त्या आमिषाला बळी पडत तरुणाने एका ॲपमार्फत ८ लाख ५७ हजार ५०० रुपये गुंतवले. त्यानंतर तरुणाला कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी नुकताच उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाचप्रकारे बोपोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीला ८ जुलै ते २४ सप्टेंबर या कालावधीत सायबर चोरांनी संपर्क साधत शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. तक्रारदाराने ११ लाख १२ हजार ४४८ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) किरण गायकवाड करत आहेत.

तिसऱ्या घटनेत मगरपट्टा सिटी येथील ४९ वर्षीय महिलेला ८ एप्रिल ते ८ मे या कालावधीत सायबर चोरांनी सोशल मीडियावरील ॲडद्वारे शेअर्स आणि आयपी ओट्रेडिंगचे प्रॉफिट मिळेल, असे सांगत २० लाख ५२ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेला कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक जगदाळे करत आहेत. 

चौथ्या घटनेत कोंढव्यातील ५७ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. तक्रारदाराने त्यावर विश्वास ठेवत २ लाख ९५ हजार ७०० रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर सायबर चोरांनी कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न दिल्याने त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खराडे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Cybercriminals Dupe Four of ₹43 Lakhs in Separate Incidents

Web Summary : Pune cyber crooks defrauded four people of ₹43 lakhs through fraudulent share trading schemes. Victims, lured by promises of high returns, invested via apps and online platforms, only to lose their money. Police have registered cases and investigations are underway.
टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजीArrestअटकMONEYपैसा