कॉसमॉस बँके प्रमाणे भारती बँके वर सायबर हल्ला; दुसऱ्या बँकेचे ATM वापरून तब्बल १ कोटी लुटले

By भाग्यश्री गिलडा | Published: July 28, 2023 11:22 AM2023-07-28T11:22:07+5:302023-07-28T11:25:33+5:30

महाराष्ट्रातील सांगली, नवी मुंबई, वरळी, सोलापूर, कोल्हापूर, मलकापूर यासोबतच दिल्ली, आणि बिहारमधील इस्लामपूर, राजस्थानातील कोथुरमध्येही हल्ला

Cyber attack on Bharti Bank like Cosmos Bank 1 crore looted | कॉसमॉस बँके प्रमाणे भारती बँके वर सायबर हल्ला; दुसऱ्या बँकेचे ATM वापरून तब्बल १ कोटी लुटले

कॉसमॉस बँके प्रमाणे भारती बँके वर सायबर हल्ला; दुसऱ्या बँकेचे ATM वापरून तब्बल १ कोटी लुटले

googlenewsNext

पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन ज्या प्रमाणे देशा परदेशातून एकाचवेळी कोट्यावधी रुपये सायबर चोरट्यांनी लुटून नेले होते. जवळपास त्याप्रकारे भारती सहकारी बँकेच्याएटीएममध्ये दुसºया बँकेच्या एटीएम कार्ड क्लोन करुन १ कोटी रुपये लुटून नेण्यात आले आहे. हा प्रकार भारती सहकारी बँकेच्या देशभरातील विविध एटीएम मशीनचा वापर १७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ या काळात झाला. कोरोना काळात तांत्रिक अडचणीचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी हा गंडा घातला आहे.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सजेर्राव जगन्नाथ पाटील (वय  ६२, रा. धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फियार्दीत म्हटल्याप्रमाणे, अज्ञात आरोपीने पुण्यातील भारती सहकारी बँकेच्या मुख्य शाखा सदाशिव पेठ, बाणेर, हडपसर, आकुर्डी, धायरी, धनकवडी-०२ या ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये दुसºया बँकेच्या डेबिड कार्डचे क्लोन करुन त्याचा वापर करून फसवणूक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा कोरोनाकाळात २०२० ते २०२१ दरम्यान घडला. त्यावेळी बँकेच्या तांत्रिक अडचणी असल्याचे सायबर चोरट्यांच्या लक्षात आहे. त्यांनी ४३९ एटीएम म्हणजेच डेबिट कार्डचा वापर करून ते क्लोन करत १२४७ ट्राजॅक्सन केले. हा सगळा प्रकार झाल्याची माहिती बँकेच्या आॅडिट मध्ये लक्षात आल्याचे मॅनेजरने सांगितले. 

महाराष्ट्र, दिल्ली, बिहार राजस्थानातून केली चोरी

महाराष्ट्रातील सांगली, नवी मुंबई, वरळी, सोलापूर, कोल्हापूर, मलकापूर यासोबतच दिल्ली, आणि बिहारमधील इस्लामपूर, राजस्थानातील कोथुर या ठिकाणी असलेल्या भारती सहकारी बँकेच्या एटीएम मशीनचा वापर करून १ कोटी ८ लाख १५ हजार ७०० रुपयांची लुट केली आहे. अ‍ॅडीटमध्ये हा प्रकार आता लक्षात आल्यावर फिर्याद देण्यात आली आहे. 

Web Title: Cyber attack on Bharti Bank like Cosmos Bank 1 crore looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.