शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp ग्रुपमधून काढून टाकले म्हणून कापली जीभ; फुरसुंगी भागातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:15 IST

आरोपीने इतरांना बोलावून किरकोळ कारणावरून मारहाण सुद्धा केली

पुणे : पुण्याच्या फुरसुंगी भागात व्हाट्सअप ग्रुप मधून टाकल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कदायक घटना घडली आहे. किरण हरपळे असे जीभ कापलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत  प्रीती किरण हरपळे (वय-38) यांनी याबाबत हडपसरपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 28 डिसेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारस घडला आहे. पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगीत ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे. तक्रारदार प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. तक्रारदार व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. सुरेश पोकळे यांनी हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना व्हाटॅसअपवरुन 'ओम हाईटस ऑपरेशन' या ग्रुप मधून रिमुव्ह का केले आहे? असा मेसेज केला. परंतु त्यास हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे पोकळे स्वतःहून हरपळे यांना भेटण्यास त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. 

पोकळे याने हरपळे यांना ग्रुपमधून काढून टाकल्याचा जाब विचारला. त्यावर ग्रुपमध्ये कोणीही कसलेली मेसेज टाकत आहे, त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला असल्याचे हरपळे यांनी सांगितले. त्यावर पोकळे याने त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या तोंडावर ठोसा मारुन इतर आरोपींना सदर ठिकाणी किरण हरपळे यांना मारहाण करुन जखमी केले. यामध्ये त्यांची जीभच कापली गेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके पुढील तपास करत आहे.

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारी