क्रूरतेचा कळस गाठला! कोंबडीसोबत अश्लील कृत्य करून व्हिडिओ अपलोड केला, मुलावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:57 IST2022-05-24T15:53:58+5:302022-05-24T16:57:37+5:30

पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस लैंगिक छळ, बलात्कार या घटनेत मोठया प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे

Cruelty culminates Uploaded video of having sex with a chicken bird filing a case against the child | क्रूरतेचा कळस गाठला! कोंबडीसोबत अश्लील कृत्य करून व्हिडिओ अपलोड केला, मुलावर गुन्हा दाखल

क्रूरतेचा कळस गाठला! कोंबडीसोबत अश्लील कृत्य करून व्हिडिओ अपलोड केला, मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस लैंगिक छळ, बलात्कार या घटनेत मोठया प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. एक दिवसाआड शहरातून लैंगिक छळाच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. अल्पवयीन मुलांकडूनही अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. बलात्कार, कुटुंबातील शारिरीक छळ यामुळेही स्त्रियांच्या सुरक्षेवर प्रश्न उभा राहू लागला आहे. लैंगिक छळाबरोबरच नराधमांकडून घृणास्पद कृत्याच्या घटनेत सध्या वाढ होऊ लागली आहे. त्यातच काल कोंबडीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाने हे घृणास्पद कृत्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 
  
एका मुलाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत त्या मुलाने एका हातात कोंबडी पकडून अश्लील कृत्य केले होते. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मे २०२१ ला पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० ते १२ वर्षे वयाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत मागील आठवड्यातही घडली होती घृणास्पद घटना; महिलेला केला होता लघवी पाजण्याचा प्रयत्न 

 शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली. तसेच तिला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सूसगाव येथे १५ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिला सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली. तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी व त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी, लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी बाटलीमध्ये लघवी गोळा करून ती फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न केला होता. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपींनी केले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना आरोपींनी घरात डांबून ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Cruelty culminates Uploaded video of having sex with a chicken bird filing a case against the child