शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विकासाला सीआरएसचा बूस्ट

By admin | Updated: October 16, 2015 01:32 IST

शहरात असलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)अंतर्गत १,५०० कोटी रुपयांचा फंड उभा राहू शकेल

पुणे : शहरात असलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)अंतर्गत १,५०० कोटी रुपयांचा फंड उभा राहू शकेल. सीएसआरचा फंड एकत्रितपणे गोळा करून तो आवश्यक गरजांवर खर्च करण्यासाठी पुणे कनेक्ट या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याशी महापालिकेच्या वतीने करार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.खासगी कंपन्यांना दर वर्षी मिळणाऱ्या नफ्याच्या २ टक्के रक्कम सीएसआरअंतर्गत खर्च करावी लागते. सीएसआर फंडाची रक्कम नेमक्या कशावर खर्च करायची, याबाबत कंपन्यांमध्ये द्विधा मन:स्थिती असते. त्यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील २८ प्रमुख कंपन्यांनी एकत्र येऊन पुणे सिटी कनेक्ट या ‘ना नफा’ तत्त्वावर काम करणाऱ्या कंपनीची स्थापना केली आहे. ही कंपनी पालिकेच्या गरजांवर सीएसआर फंडाच्या रकमेतून पैसे खर्च करणार आहे. गुरुवारी सीएसआर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आयुक्तांची बैठक झाली. तीमध्ये पुणे कनेक्ट कंपनीशी करार करण्यावर चर्चा करण्यात आली. सध्या पुणे कनेक्टमध्ये २८ कंपन्या सहभागी झाल्या असल्या, तरी नजीकच्या काळात आणखी कंपन्या सहभागी होणार आहेत. >> सीएसआरअंतर्गत पैसे नेमके कुठे खर्च करायचे, महापालिकेच्या महत्त्वाच्या गरजा कोणत्या आहेत, याची कंपन्यांना फारशी माहिती नसते. शहरात असलेल्या हजारो कंपन्यांना पालिकेकडून माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर, सगळ्या कंपन्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पुणे कनेक्ट कंपनी स्थापन करण्यात आली आहे.’’- कुणाल कुमार, आयुक्त