शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पुण्यातील कोंढव्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ! तलवारीसह माजवली दहशत, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 11:59 AM

दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली, नागरिकांनीच घेतली तलवार हिसकावून

ठळक मुद्देअशरफनगर भागात जाऊन रस्त्यावर उभे असणार्‍या ४ ते ५ जणांना त्यांच्याकडील कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला

पुणे: कोंढव्यात अशरफनगर भागात गुन्हेगारांच्या टोळीने रस्त्यात तलवारी नाचत दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. परिसरात  दहशत निर्माण करून एकावर वारही केले. तसेच हॉस्पिटलची काच फोडून नुकसान केले. या घटनेनंतर मंगळवारी भर दुपारी पुन्हा अशरफनगर भागात हे गुंड धुमाकूळ घालत असताना नागरिकांनीच शेवटी पुढे होऊन या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून तलवार हिसकावून घेऊन ती पोलिसांच्या ताब्यात दिली.

कोंढवा पोलिसांनी शहबाज ऊर्फ लंबु खान (वय २४, रा. अशरफनगर), अरबज खान (वय ३०, रा. अशरफनगर) व त्यांच्या इतर ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. ओबेदउल्ला अब्दुलरहिम खान (वय ३३, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

डॉ. खान यांचे अशरफनगर येथे शिफा पॉली क्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजता  दोघे जण अचानकपणे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी तेथे बसलेल्या २ महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे शटर लावून घ्या अशी दमबाजी करु लागले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने खान बाहेर आले. त्यांनाही ते शटर बळजबरीने लावून घेण्याबाबत सांगू लागले. परंतु, त्यांनी विरोध केल्यावर हॉस्पिटलच्या काचेवर तलवार मारुन काच फोडली. तेथून ते निघून गेले. त्यानंतर हे टोळके एका मेडिकल स्टोअर्सवर जाऊन मेडिकलचे शटर खाली घ्यायचे.

मेडिकलमधून त्यांना पाहिजे ते औषध फुकट द्यावयाचे. नाही दिले तर मारहाण करण्याची व मेडिकल स्टोअर्सची तोडफोड करण्याची धमकी दिली. बाहेर जाऊन त्यांनी हवेत तलवारी फिरवून मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करुन या भागातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करायला लावली. अशरफनगर गल्ली नं. १२ मध्ये जाऊन तेथे रस्त्यावर उभे असणार्‍या ४ ते ५ जणांना त्यांच्याकडील कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पाहून ते पळून गेले. त्यावेळी या ठिकाणी भाजी विक्रेते सलिम शेख यांची भाजीची गाडी पलटी केली. चहा विक्री करणार्‍या महिलेला जबरदस्तीने चहा विक्री बंद करण्यास सांगितले. गुफरान अन्सारी यांचे किराणा दुकान बंद करुन त्याला कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. तोडफोड करणार्‍यांच्या दहशतीमुळे खान यांनी सोमवारी रात्री तक्रार दिली नव्हती. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता खान तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात जात असताना हे दोन्ही गुंड त्यांच्या हॉस्पिटलच्या परिसरात तलवारी घेऊन हवेत फिरवून, मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करुन सर्व दुकानदारांना हप्ते द्या नाहीतर दुकान बळजबरीने बंद करायला भाग पाडत होते. त्यावेळी लोकांनी त्यांना पकडून त्यांच्याकडील तलवार जबरदस्तीने हिसकावून घेतली. तेव्हा आमच्याविरुद्ध कोणी तक्रार दिली तर मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. नागरिकांनी ही तलवार कोंढवा पोलिसांकडे जमा केली आहे. त्यानंतर कोंढवा पोलिसांना जाग आली व त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात सर्वत्र लॉकडाऊन सुरु असताना कोंढव्यात मात्र सर्व राजरोसपणे सुरु होते. त्यामुळे रात्री अपरात्री गुंड टोळक्याने फिरुन लोकांवर दहशत पसरवित असल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक