शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

दौंड, इंदापूरला पिके जळाली

By admin | Updated: August 18, 2014 05:12 IST

जिल्ह्यात पावसामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने सर्वच तालुक्यात शेती आणि पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता

जिल्ह्यात पावसामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने सर्वच तालुक्यात शेती आणि पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे आगमन झाले पण जिल्ह्याच्या काही भागातच. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरकरांची त्याने यंदाही निराशाच केली. 'लोकमत'ने दौंड, इंदापूरमध्ये केलेल्या पाहणीत पाणीप्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसले. उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. मनोहर बोडखे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फक्त ५५ ते ६0 मिलिमीटर पाऊस दौंड तालुक्यात झाला आहे. त्यामुळे शेतातील पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. मुळशी तालुका : हंगाम लांबला या वर्षी पावसाने तब्बल दीड महिना दडी मारल्याने भात लागवडीचा हंगाम लांबला आहे. मात्र, भातपिकास वरदान ठरलेल्या चारसूत्नी पद्धतीने भात लागवड करण्याच्या प्रमाणात दर वर्षीच्या तुलनेत यंदा दीड पटीने वाढ झाली आहे. भोर तालुका : ८0 टक्के लागवडतालुक्यातील खरीप हंगामातील कडधान्य, गळीत धान्य व तृणधान्याची १६,४00 हेक्टर क्षेत्रापैकी १३,२७३ हेक्टरवर म्हणजे ८0 टक्के लागवड पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक भात, भुईमूग, घेवडा, सोयाबीनचा समावेश आहे . कळस : इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद होत आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने सुमारे छत्तीस गावांमधील शेती अडचणीत आली आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाची दाहकता सहन करावी लागत असल्याने कायमस्वरूपी सिंचनाची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तालुक्यामध्ये उत्तरेला उजनी जलाशय, दक्षिणेला नीरा नदी, पूर्वेकडे भीमा नदी आहे. तालुक्याच्या तिन्ही बाजुंनी पाणी आहे. तसेच खडकवासला साखळी प्रकल्प व भाटघर, वीर धरणाचे पाणी कालव्यातून तालुक्यातील सिंचनासाठी वापरले जाते. मात्र नीरा-डावा कालव्याने सिंचन हे दक्षिण बाजूला आहे. तर खडकवासला कालव्याचे सिंचन हे उत्तरेला आहे. यामुळे तालुक्याच्या काही भागाला पाणी मिळते तर काही भाग सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. या परिसरातील लाकडी, निंबोडी, निरगुडे, लामजेवाडी, वायसेवाडी, शिंदेवाडी, काझड, धायगुडेवाडी , कळस, बिरगुडी, बोरी, पिलेवाडी, रूई, थोरातवाडी, कडबनवाडी, भरणेवाडी, कौठडी, या भागातील शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणयची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.लाकडी -निंबोडी उपसासिंचन योजना, निमगाव केतकी येथील केतकेश्‍वर उपसासिंचन योजना तसेच नीरा डावा कालव्यावरील योजना मार्गी लावण्याची गरज आहे. (वार्ताहर) पर्जन्यमान घटलेदौंड तालुक्यात सरासरी ४00 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फक्त ५५ ते ६0 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला आहे. गेली दोन वर्षे सरासरी ३00 च्या जवळपास पाऊस झाला होता. तालुक्यात ५ हजार ४७८ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, पावसाअभावी पेरण्या कमी झाल्या आहेत. ऊस आणि बाजरी ही मुख्य पिके असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रदीप घाडगे यांनी सांगितले.

 तालुक्यातील जिरायत पट्टय़ातील डाळिंब, ताम्हाणवाडी, खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, रोटी, वासुंदे या गावांसह वाड्यावस्त्यांसाठी ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे तहसीलदार उत्तम दिघे यांनी सांगितले. दौंड : गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फक्त ५५ ते ६0 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला आहे. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.ऑगस्ट संपत आला, तरी दौंड तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे उभी पिके जळून चालली आहेत. मुळा-मुठा, भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.ऐन पावसाळ्यात जिरायत पट्टय़ातील गावांसह वाड्यावस्त्यांना ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागात मुबलक पाणी असताना विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ मटाकुटीस आला आहे. तालुक्याला पाच आर्वतने मिळायची. आता हे प्रामण तीनवर आले आहे. जिरायत पट्टय़ात जनाई-शिरसाई योजनेचे पाणी सोडले; मात्र हे पाणी फक्त वासुंदे येथील तलावात आले. मात्र, परिसरातील काही तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे खरिपांच्या पेरण्या झाल्या नाहीत, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. (वार्ताहार) जिल्ह्यात पावसामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने सर्वच तालुक्यात शेती आणि पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे आगमन झाले पण जिल्ह्याच्या काही भागातच. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरकरांची त्याने यंदाही निराशाच केली. 'लोकमत'ने दौंड, इंदापूरमध्ये केलेल्या पाहणीत पाणीप्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसले. उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.