जुगार खेळणाऱ्या चौघांवर गु्न्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST2021-04-08T04:10:09+5:302021-04-08T04:10:09+5:30

अनिकेत महादू रोकडे, ज्ञानेश्वर बाबूराव डुकरे (वय ३५), नवनाथ शिवाजी डुकरे (वय ३९), बाबाजी भाऊ सोनवणे (वय ३८, ...

Crimes against four gamblers | जुगार खेळणाऱ्या चौघांवर गु्न्हा

जुगार खेळणाऱ्या चौघांवर गु्न्हा

अनिकेत महादू रोकडे, ज्ञानेश्वर बाबूराव डुकरे (वय ३५), नवनाथ शिवाजी डुकरे (वय ३९), बाबाजी भाऊ सोनवणे (वय ३८, सर्व रा. औरंगपूर, ता. जुन्नर, जि. पुणे) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी दिली आहे.

औरंगपूर येथे क्रिकेट मैदानालगत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस नाईक साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल, जायभाये, वाघमारे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी चार जण पळून गेले, तर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम, मोबाईल असा २६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: Crimes against four gamblers