घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपीस गुन्हे पथकाकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:23 IST2025-02-05T15:23:02+5:302025-02-05T15:23:27+5:30

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर येथे चोरी केल्याचे कबूल केले

Crime Squad arrests two accused in house burglary and vehicle theft case | घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपीस गुन्हे पथकाकडून अटक 

घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपीस गुन्हे पथकाकडून अटक 

लोणी काळभोर : लोणी काळभोर व हडपसर परिसरात घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयातील दोन सराईत गुन्हेगारांना देशी कट्ट्यासह गुन्हे शाखा पथक ६ ने अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर गुन्हे पथकाच्या युनिट ६ मधील पोलिस हवालदार नितीन मुंडे यांना बातमीदाराकडून सय्यदनगर येथे एक इसम देशी बनावटीचे शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलीस पथक त्याठिकाणी गेले असता तेथे समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं.२३, सय्यदनगर, हडपसर, पुणे)आढळून आला. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरी केलेल्या दोन मोटर सायकल हस्तगत केल्या.

आरोपीकडे अधिकची चौकशी केली असता त्याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर येथे चोरी केल्याचे कबूल केले. शेख यास अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा सराईत यश मुकेश शेलार, (वय २० वर्षे, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) यास अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन एक देशी कट्टा हस्तगत करण्यात आला.असा एकूण १२ लाख १७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

ही कामगिरी गुन्हे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली.

Web Title: Crime Squad arrests two accused in house burglary and vehicle theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.