शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
3
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
4
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
5
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
6
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
7
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
8
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
9
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
10
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
11
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
12
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
13
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
14
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
15
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
16
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
17
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
18
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
19
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
20
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:47 IST

गेल्या वर्षापासून सातत्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती

दौंड : बुलेट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन म्हणून विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी राज्य राखीव पोलिस बल गट क्र.७ चे जवान किरण मोरे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी वैष्णवी किरण मोरे ( वय २५, मूळ रा. मियाटाकळी, ता. राहुरी, जि. पुणे, सध्या राहणार पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी पती किरण मोरे, सासू सुमन मोरे, सासरे सुरेश मोरे, दीर नितीन मोरे (सर्व रा. टाकळी मिया, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ७ येथे किरण मोरे हा पोलिस जवान म्हणून सेवेत आहे. दरम्यान, तो आणि त्याची पत्नी वैष्णवी आणि एक चार वर्षांचा लहान मुलगा असे दौंड येथे राहत होते.बऱ्याचदा सासू-सासरे आणि दीर देखील अधूनमधून दौंडला येत होते. यावेळी वैष्णवीचा छळ केला जात होता. तुझ्या वडिलांकडून बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून गेल्या वर्षापासून सातत्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती, असे वैष्णवी मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारी