Crime News: पुण्यातील खासगी शिकवणीत घडला भयंकर प्रकार..! ऑफिस बॉयकडून व्हिडिओ काढत विद्यार्थ्यावर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:33 IST2026-04-12T11:33:42+5:302026-04-12T11:33:53+5:30
Crime News - मुलगा इयत्ता ८ वीमध्ये शिकत असून तो खासगी शिकवणीसाठी मार्केट यार्ड भागातील एका क्लासमध्ये जात होता

Crime News: पुण्यातील खासगी शिकवणीत घडला भयंकर प्रकार..! ऑफिस बॉयकडून व्हिडिओ काढत विद्यार्थ्यावर अत्याचार
पुणे : खासगी शिकवणीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी ऑफिस बॉयला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास दिलीप गायकवाड (वय ३५, मूळ रा. हराळवाडी, सोलापूर) असे आरोपी ऑफिस बॉयचे नाव आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा इयत्ता ८ वीमध्ये शिकत असून तो खासगी शिकवणीसाठी मार्केट यार्ड भागातील एका क्लासमध्ये जात होता. गेल्या चार-पाच दिवसापूर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवण झाल्यानंतर तो वडिलांना म्हणाला मी उद्या शाळेत जाणार नाही. वडील त्याला म्हणाले, तू अनेकदा सुट्टी मारतो. तुला शाळेत जायला हवे. त्यावेळी मुलगा रडायला लागला. वडिलांनी विश्वासात घेऊन त्याला विचारले असता, त्याने विकासच्या कृत्याची माहिती दिली.
विकास हा डिसेंबर २०२५ पासून मुलावर लैंगिक अत्याचार करत होता. एवढेच नव्हे, तर आरोपीने मुलाचे फोटो काढून त्याला मानसिक त्रास दिला. त्यानंतर वडिलांनी क्लासमध्ये जाऊन महिती घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी गायकवाड याला अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत.