इव्हेंट रद्द झाल्याच्या विचारणेतून भावांना टोळक्याची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:53 IST2026-02-10T17:53:35+5:302026-02-10T17:53:49+5:30
इव्हेंट रद्द झाल्याची पूर्वकल्पना का दिली नाही? अशी विचारणा केली.

इव्हेंट रद्द झाल्याच्या विचारणेतून भावांना टोळक्याची मारहाण
पुणे : इव्हेंट रद्द झाल्याची पूर्वकल्पना का दिली नाही? अशी विचारणा केल्याच्या रागातून भावांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. ही घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. याप्रकरणी सहाजणांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश मोरे (वय २५), अक्षय करपे (वय २५) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम संजय शिंदे ( वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी प्रथमेश याला इव्हेंट रद्द झाल्याची पूर्वकल्पना का दिली नाही? अशी विचारणा केली. त्याचा राग धरून आरोपीसह चारजणांनी फिर्यादी यांचा भाऊ सारंग शिंदे यांना हाताने मारहाण केली.
फिर्यादी मध्ये पडले असता त्यांनाही बेस बॉल स्टिकने मारून गंभीरपणे जखमी करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक भांडवलकर पुढील तपास करीत आहेत.