शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

बारामती : घरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडावरील चिंचा पाडत असताना एकाने त्याला दमदाटी करून मारहाण केली. ही घटना ...

बारामती : घरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडावरील चिंचा पाडत असताना एकाने त्याला दमदाटी करून मारहाण केली. ही घटना खांडज (आटोळेवस्ती, बारामती) येथे बुधवारी घडली. याप्रकरणी कांतीलाल दत्तात्रय आटोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तम नारायण आटोळे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

--

इंदापुरात चोरीची वाळू जप्त

--

इंदापूर : चोरून आणलेली वाळू पळसेदव बाजारात विकली जात असताना पोलिसांनी धाड टाकून ती जप्त केली मात्र पोलिसांची चाहूल लागताच चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत बेपत्ता झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पळसदेव येथे घडली. पोलिसांनी ट्रक (एमएच१६, क्यू ४६२२) आणि चार ब्रास वाळू जप्त केली.

--

अर्धा एकर गव्हाची चोरी

--

जेजुरी : मावडी सुपे गावाच्या हद्दीतील एका शेतातील सुमारे अर्धा एकर गव्हाच्या पिकांची चोरी झाली. ही घटना मावडी सुपे गावातील गट नंबर १२० येथील शेतात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी भानुदास नारायण कोलते, अजय आण्णा बादल, मीनाक्षी आण्णा बादल, अंजना महादेव बादल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

---

उरुळीत मोटारसायकलची चोरी

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथील तांबेवस्ती येथे एका घराच्या अंगणात लॉक करुन ठेवलेली मोटारसायकल (एनएच१४, डीवाय ५३८०) चोरट्यांने कुलूप तोडून लंपास केली. ही घटना सोमवारी दिवसा घडली. याप्रकरणी नितीन गंभीरराव हिवाळे यांनी फिर्याद दिली.

---