Pune | दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचा छापा, 14 जुगारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:53 IST2023-01-31T12:50:39+5:302023-01-31T12:53:10+5:30

जुगार खेळणाऱ्या या सर्वांना गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात सोपवले...

Crime Branch raids in Dattawadi Police Station limits, arrests 14 gamblers | Pune | दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचा छापा, 14 जुगारी ताब्यात

Pune | दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचा छापा, 14 जुगारी ताब्यात

पुणे/किरण शिंदे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणाऱ्या अवैध धंद्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 14 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 15 जणांविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळणाऱ्या या सर्वांना गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पत्राच्या शेडमध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीयरित्या पाळत ठेवून त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना काही व्यक्ती बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावून खेळत व खेळत असल्याचे दिसून आले.

या ठिकाणाहून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी या ठिकाणाहून मटका जुगारातील रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Crime Branch raids in Dattawadi Police Station limits, arrests 14 gamblers