शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: June 21, 2016 00:22 IST

पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहराच्या हद्दीत गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री पकडला. एक टन गोमांस जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहराच्या हद्दीत गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री पकडला. एक टन गोमांस जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी युनूस हुसेन शेख (वय ४२, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) व इमाम खलील खान (वय ३३, रा. कुर्ला ईस्ट, नेहरूनगर) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे-नाशिक महामार्गावर साळी हॉस्पिटलसमोर शनिवारी रात्री गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. जुन्नरकडून मुंबईकडे जाणाऱ्या पिक-अप टेम्पो (एमएच २६ एच ४१६८) मधून गोमांस घेऊन जात असल्याचा संशय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आला. त्यांनी ही माहिती मंचर पोलिसांना दिली. पोलिसांनी महामार्गावर बॅरिकेड लावून टेम्पो अडविला. त्यामध्ये १ टन गोमांस आढळले. वैद्यकीय अधिकारी डॉ. चिखले व डॉ. निघोट यांनी तपासणी केली त्या वेळी ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बुरुड याने फिर्याद दिली. युनूस हुसेन शेख (वय ४२, रा. जुन्नर) व इमाम खलील खान (वय ३३, रा. नेहरूनगर) या दोघांच्याविरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, १ लाख रुपये किमतीचे १ टन गोमांस व टेम्पो पोलिसांनी जप्त केला. आज मंचर ग्रामपंचायतीने गोमांसाची विल्हेवाट लावली. या वेळी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले, उपसरपंच महेश थोरात, दत्तप्रसाद गाढवे, सचिन पठारे, अभय चिखले, विशाल थोरात, कुणाल बाणखेले, गणेश पिंगळे, अभय राजगुरू, विशाल बाणखेले, शुभम गवळी, प्रसाद बोऱ्हाडे, प्रतीक बनबेरू आदी उपस्थित होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.