शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय?

By अतुल चिंचली | Updated: June 2, 2023 13:54 IST

Maharashtra Board SSC Result 2023- शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता निकाल कसा दिसतो?

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra Board SSC Result 2023) इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर हाेणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले हाेते. शुक्रवारी (दि. २) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार असल्याचे शिक्षणमंडळाकडून सांगण्यात आले होते. परंतु एका माध्यमाच्या वेबसाईटवर निकाल एक तास अगोदर १२ वाजल्यापासून पाहायला मिळू लागला. लोकमतने त्या वेबसाईटवर पाहणी केली असता हि माहिती समोर आली आहे. त्यावरून लोकमतच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांना विचारले असता त्यांनी हा निकाल फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे सांगण्यात आले आहे. 

काही पालकांनी या वेबसाइटवरून निकाल काढले होते. त्याची शहानिशा करण्यासाठी लोकमतने १ नंतर जाहीर होणाऱ्या निकालाबरोबर १२ ला दिसणाऱ्या निकालाची पडताळणी केली. दोन्ही निकाल सारखेच दिसून आले आहेत. मात्र त्यांची प्रिंट वेगळी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये मार्क आणि टक्केही सारखेच होते. शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता एका माध्यमाच्या वेबसाईटवर निकाल दिसतोच कसा? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. याविषयाबाबत लोकमतने शरद गोसावी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या वेबसाईटवरील निकाल फेक असल्याचे सांगितले. पण अशा फेक निकालामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते का? याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.    

राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्च २०२३ दरम्यान पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नऊ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ लाख ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश हाेता. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या निकालाबराेबर इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध हाेणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत दि. १४ जून राेजी दुपारी ३ नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येईल. 

इथे पहा निकाल 

१. www.mahresult.nic.in २. http://sscresult.mkcl.org ३. https://ssc.mahresults.org.in

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थी