शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 9:08 PM

न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले.

ठळक मुद्देवकिलांचा आंदोलनात सहभाग, परिसरात शुकशुकाटआंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चात शहरातील वकीलही सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाला सुट्टी देण्यात आली नसली तरी वकीलवर्ग व पक्षकार न आल्याने गुरुवारी कामकाज ठप्प होते.      न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. तसेच अनेक वकील देखील मोर्चात उत्स्फू र्तपणे सहभागी झाले होते, अशी माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनचे (पीबीए) अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी दिली.बंद जाहीर करण्यात आल्यामुळे वकिलांनी देखील पक्षकारांना सुनावणी होणार नसल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे त्यामुळे अनेक पक्षकार देखील न्यायालयात आले नाही.  इतर दिवशी वकील आणि पक्षकारांची गर्दी असणा-या न्यायालयात गुरुवारी शुकशुकाट दिसत होता. कौटुंबिक न्यायालयात देखील असेच चित्र होते. दरम्यान, कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु,  येथे कोणताही गैरप्रकार झाला नाही, अशी माहिती न्यायालयातील चौकीचे पोलीस निरीक्षक प्रकाश शहा यांनी दिली.         आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत. ज्या आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांनी याबाबतची माहिती पीबीएला द्यावी, असे आवाहन अ‍ॅड. पवार यांनी यावेळी केले. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले, असे अ‍ॅड. पवार यांनी सांगितले.              मराठा क्रांती मोर्चामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी यापुर्वी पीबीएच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भूपेंद्र गोसावी, अ‍ॅड. रेखा करंडे, सचिव अ‍ॅड. संतोष शितोळे, अ‍ॅड. लक्ष्मण घुले, खजिनदार अ‍ॅड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस अ‍ॅड. सुदाम मुरकुटे, अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड आदी यावेळी उपस्थित झाले होते.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद