काय सांगता! व्हेल माशाची तब्बल एक कोटींची उलटी पाठवली कुरियरने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:57 PM2021-12-08T14:57:13+5:302021-12-08T15:00:02+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती...

courier sends 1 crore worth of whale fish vomit crime news | काय सांगता! व्हेल माशाची तब्बल एक कोटींची उलटी पाठवली कुरियरने

काय सांगता! व्हेल माशाची तब्बल एक कोटींची उलटी पाठवली कुरियरने

Next

पिंपरी : व्हेल माशाची एक कोटी १० लाखांची उलटी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी कुरियरने पाठविल्याचे समोर आले आहे. पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही उलटी पकडली असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मोशी टोलनाका येथे सोमवारी (दि. ६) सकाळी ही कारवाई झाली.

जॉन सुनील साठे (वय ३३, रा. मगरमळा, नाशिक रोड), अजित हुकूमचंद बागमार (वय ६१, रा. कारंजा नाशिक), मनोज अली (रा. भिवंडी नाशिकफाटा पिंजारवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील जॉन आणि अजित या दोघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित आणि मनोज या दोघांनी आरोपी जॉन याला कुरियरने व्हेल माशाची उलटी पाठवली. आरोपी जॉन हा व्हेल माशाची ही उलटी बेकायदेशीरपणे विकणार होता.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोशी टोलनाका येथे सापळा लावून आरोपी जॉन याला ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी एक कोटी १० लाख रुपये किमतीची व्हेल माशाची ५५० ग्रॅम उलटी जप्त केली. पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.

Web Title: courier sends 1 crore worth of whale fish vomit crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.