शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पुणे शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार 'चौकीदार' : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:21 PM

सध्या कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये..

ठळक मुद्देकोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा

पुणे :  पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी भाजपचे 100 नगरसेवक, 8 आमदार व खासदार आजपासून चौकीदार म्हणून काम करणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीशभाऊ बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तपकिर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, राजेश पांडे यांनी मनपा आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा केली. यावेळी बापट म्हणाले, कोरोना नियंत्रण करीत ४ आयएएस अधिकाऱ्यांना शहरातील वेगवेगळे भाग वाटून देण्यात आहे आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण होणे जरुरी आहे. आमचे असंख्य कार्यकर्ते काम करायला तयार आहेत. लाखो लोकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाटप करण्याचे काम त्यांनी केले आहे.      सध्या कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही बापट यांनी केले. जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होण्याची आज गरज असून, ही संख्या बाहेर येणे गरजेचे आहे. आगामी काळात कोरोनाला रोखण्यासाठी १०० नगरसेवक, आमदार, खासदार चौकीदार म्हणून काम करणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांना आणखी पुढे जायचे असून आजची ही बैठक यशस्वी झाली आहे.       पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे.१६२ वार्डात हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर काम व्हावे, गावभर कार्यकर्त्यांनी फिरत बसू नये, असा सल्लाही बापट यांनी दिला. शहरात सध्या ५० टक्केच डॉकटरांनी दवाखाने उघडे ठेवले. आणखी ५० टक्के दवाखाने उघडण्यासाठी आम्ही विनंती करू. किटसह सर्व सुविधा महापालिका द्यायला तयार आहेत. खोकला झाला म्हणजे कोरोना नाही. तर, पालकमंत्री यांनी कोरोना संदर्भात बैठक घेतल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींची बैठक झाल्याची आठवण बापट यांनी करून दिली. आम्हाला कोरोनाचे राजकारण करायचे नाही. भाजप कोरोनाच्या युद्धात काम करणार आहे. राज्यभर आंदोलन केल्याने चांगला परिणाम झाला. महापालिकेच्या कामाच्या बाबत समाधनी असून,आणखी चांगले काम व्हावे. जनतेच्या हिताचे काम व्हावे. प्रशासनाने सातत्याने  लोकप्रतिनिधीशी बोलले पाहिजे, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMLAआमदारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाgirish bapatगिरीष बापटCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस