शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी धरले आयुक्तांना धारेवर

By admin | Updated: October 20, 2015 03:15 IST

आर्थिक स्थितीचे कारण दाखवून विकासकामांमध्ये कपात करण्याच्या आयुक्तांच्या परिपत्रकावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आयुक्तांना धारेवर धरले. विकासकामांना कसलीही

पुणे : आर्थिक स्थितीचे कारण दाखवून विकासकामांमध्ये कपात करण्याच्या आयुक्तांच्या परिपत्रकावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आयुक्तांना धारेवर धरले. विकासकामांना कसलीही कात्री लागणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्यानंतरच आयुक्तांची सुटका झाली. सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र आले असताना महापौर दत्तात्रय धनकवडे मात्र सभेत एकाकी पडले होते.विकासकामांतील कपातीचा विषय सुरू झाल्यावर सुरुवातीला सौम्यपणे बोलत असलेल्या नगरसेवकांना सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोखले यांनी या संदर्भात व्यक्त केलेल्या तीव्र मतांमुळे जोर आला. गोखले यांनी ५ कोटींची कामे असतील तरीही ५ टक्के कपात व ५ लाखांची असतील तरीही ५ टक्केच कपात हा काय प्रकार आहे, असा प्रश्न विचारून थेट महापौर व आयुक्तांवरच तोफ डागली. त्यानंतर मनसेचे राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, बाळासाहेब शेडगे, अस्मिता शिंदे, रूपाली पाटील-ठोंबरे, भाजपाचे गणेश बीडकर, वर्षा तापकीर, मनीषा घाटे आदींनी आयुक्त कुणाल कुमार कोणत्या अधिकारात कपात करीत आहेत, असा सवाल केला. सर्वच नगरसेवकांनी या विषयावर आरडाओरडा सुरू केला.महापौर असे कोंडीत सापडलेले असताना सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक सुभाष जगताप हे दोघे वगळता राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचे कोणीही नगरसेवक त्यांना मदत करीत नव्हते. त्यामुळे महापौरांनी आयुक्तांना खुलासा करण्यास सांगितले. ते परिपत्रक म्हणजे उत्पन्न आढावा बैठकीचे इतिवृत्त होते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठक झाली त्या वेळी मागील वर्षाच्या तुलनेत २५० कोटी रुपये जादा खर्च झाला असल्याचे व उत्पन्नात मात्र घट असल्याचे दिसत होते. त्यामुळे तो उपाय पुढे आला. मात्र, विकासकामांत अशी कोणताही कपात करण्याचा विचार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.स्थायी समितीने मान्यता दिलेले वर्गीकरणाचे (एखाद्या विषयासाठीची तरतूद दुसऱ्या विषयावर खर्च करणे) काही कोटी रुपयांचे प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आले. एकीकडे स्थायी समितीची सभा सुरू होती व दुसरीकडे त्या सभेत असलेले विषय लगेचच सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी आणले गेले. यावर मनसेचे वागस्कर, शिंदे यांनी आक्षेप घेतला. केमसे यांच्या विनंतीनंतर हे सर्व विषय मंजूर करण्यात आले. आयत्या वेळचे म्हणून दाखल झालेल्या विषयांनाही चर्चेअंती मान्यता देण्यात आली. राजू पवार, सचिन भगत, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नंदा लोणकर, योगेश गोगावले, दिलीप बोराटे आदींनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)