शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune : ससून मधले बेड वाढणार नाहीतच. डॉक्टरांच्या संपाच्या भूमिकेमुळे निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 20:12 IST

ससूनच्या निवासी डॉक्टरांनी जर प्रशासनाने बेड्स वाढवले तर संपावर जाण्याची भूमिका घेतली होती।

पुणे : ससून रुग्णालयातील बेड अखेर वाढणार नसल्याचंच स्पष्ट झालं आहे. डॅाक्टरांच्या संपामुळे सोमवारपर्यंत बेड वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. 

शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता ससुन मधले बेड वाढवले जावेत अशी मागणी पुढे येत होती. जवळपास तीनशे नव्या बेड्स वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण रुग्णालयात एका बेडवर दोन पेशंट असताना आता मात्र बेड वाढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ससुनच्या डॅाक्टरांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, ससूनमध्ये मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट बेड कोरोना रुग्णांसाठी वापरात आहे. नेहमीच तिथे लोड येते. ग्रामीणमधला बरा न होणारा पेशंट ससूनला येतो. ससूनला आधीच खूप बेड वाढवले आहेत.त्यामुळे सध्या तेथील कोरोना बेड्सची संख्या वाढविण्यात येणार नाही. 

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या  बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

तसेच ससूनच्या निवासी डॉक्टरांना सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. तुमचे रास्त मुद्दे नक्की ऐकून घेऊ, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर काही कडक पावलं उचलावी लागतील असा सज्जड इशारा देखील दिला आहे. 

पवार म्हणाले,ससूनमधील निवासी डॉक्टरांनी परिस्थितीची भान ठेवून टोकाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच कोण पक्ष काय म्हणतो याला महत्व नसतं. तर शहराच्या हिताचे काय हे पाहुन निर्णय घेतो.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरStrikeसंप