शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Coronavirus: शेअर कॅब जिवावर बेतली; मुंबईतील मृत व्यक्तीने केलेला पुण्यातील कोरोनाग्रस्तांसोबत प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 4:08 PM

देशात 10 मार्चला 50 जण कोरोनाने ग्रस्त होते. तर आज ही संख्या 126 वर पोहोचली आहे. यापैकी 17 जण परदेशी नागरिक आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 12 जण कोरोना व्हायरसशी मुकाबला देऊन बरे झाले आहेत. corona virus positive

ठळक मुद्देया वृद्धाची मुलगी आणि पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.महाराष्ट्रात पहिले रुग्ण पुण्यामध्ये आढळले होते. पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना सर्दी, ताप जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मुंबई : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये आज कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 64 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये 63 वर्षीय व्यक्ती आणि दिल्लीमध्ये 69 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातील बुलढाण्याच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वाशेच्या वर गेली आहे, 17 मार्चला नवीन 7 रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात पहिले रुग्ण पुण्यामध्ये आढळले होते. पती-पत्नी आणि त्यांची मुलगी मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुबईहून मुंबईत आले होते. यावेळी ते कॅबने पुण्याला गेले होते. पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना सर्दी, ताप जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. कारण त्यांना पुण्यात पोहोचविणारा कॅबचालकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यातही गंभीर बाब म्हणजे आज मुंबईमध्ये मृत्यू झालेला रुग्णही त्याच कॅबने आला होता.

मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर या 64 वर्षांच्या व्यक्तीने पुण्यातील पती-पत्नीसोबत कॅब शेअर केली होती. यानंतर त्यांना अधेरीतील घरी सोडून कॅब पुण्याकडे निघाली होती. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर या वृद्ध रुग्णाची तब्येत आणखीनच खालावली होती. उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. या वृद्धाची मुलगी आणि पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.

देशात 10 मार्चला 50 जण कोरोनाने ग्रस्त होते. तर आज ही संख्या 126 वर पोहोचली आहे. यापैकी 17 जण परदेशी नागरिक आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 12 जण कोरोना व्हायरसशी लढा देऊन बरे झाले आहेत.

दरम्यान, थोड्य़ाच वेळात मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून पुण्यातही पुढील 3 दिवस हॉटेल, बार बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल मालकांच्या संघटनेकडून घेण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई