Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:00 IST2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:09+5:30

पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत.

Coronavirus : 'Corona Warriors' who generous on life for Pune citizens health | Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

ठळक मुद्देअहोरात्र सेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागाचा मोठा वाटा

पुणे : शहरात ‘कोरोना विषाणू’चे रुग्ण आढळून आल्यानंतर या आजाराचे गांभिर्य पुणेकरांमध्ये पोचण्यास सुरुवात झाली. परंतू, एक महिना आधीपासून पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये कक्ष उभारण्यात आलेला होता. पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. ‘आरोग्य सैनिक’ असलेले हे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी अहोरात्र काम करीत असूनही त्यांची त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट वैद्यकीय क्षेत्रात येताना घेतलेली शपथ सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांचे ‘कोरोना’सोबतचे युद्ध सुरु आहे. 
महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये सध्या महापालिकेचे १२, राज्य शासनाचे ६ आणि ससूनचे ५ डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यांना जवळपास ४० ते ४५ नर्सिंग कर्मचारी मदत करीत आहेत. घरामधून निघताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय मात्र चिंताग्रस्त झालेले असतात. घरामधून बाहेर पडताना ‘जरा जपून, काळजी घ्या’ असे सांगायला कुटुंबिय विसरत नाहीत. काळजामध्ये कालवाकालव करणारी ती वाक्य तिथेच उंबऱ्यात सोडून आपल्या ‘कर्तव्या’वर हजर होणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या भावना‘लोकमत’ने जाणून घेतल्या. 
पुण्यामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली तयारी आणि पूर्वतयारी ही अन्य महापालिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. मुंबईमध्ये अद्यापही जागा मिळालेली नसताना पुण्यात पालिकेने ३०० खाटांचे विलगीकरण रुग्णालये, खासगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग आणि विलगीकरण कक्षामध्ये खाटांची व्यवस्था लावून घेतली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महापालिकांकडून संपर्क साधण्यात येत असून पालिकेने केलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली जात आहे. 
======
नेमके कसे करतात डॉक्टर काम?
डॉक्टर्सना त्यांच्या कामाच्या वेळांचे नियोजन करु न देण्यात आले आहे. ते ठरवून दिलेल्या वेळेत डॉ. नायडू रुग्णालयामध्ये हजर असतात. परंतू, आवश्यकतेनुसार डॉक्टर्स १२ ते १५ तास काम करीत आहेत. रुग्णांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना कंटाळा येणार नाही, त्यांच्या रागाचा पारा चढणार नाही याची काळजी घेत त्यांना शांत ठेवण्याचे कामही करावे लागत आहे. रुग्णांशी संवाद साधण्याकरिता समुपदेशकांचीही मदत घेण्याची तयारी करण्यात आली आहे.
=====

Web Title: Coronavirus : 'Corona Warriors' who generous on life for Pune citizens health