Coronavirus : ‘कोरोना’तही सर्जनशीलतेला धुमारे..! जुन्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:22 AM2020-03-19T05:22:00+5:302020-03-19T05:22:53+5:30

‘कोरोना, ‘कोरोना आणि ‘कोरोना’ या चर्चेमधून लोकांना काही काळापुरते का होईना बाहेर काढण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती हे उत्तम माध्यम ठरत आहे.

Coronavirus: 'Corona' also blends creativity! Video of old songs goes viral | Coronavirus : ‘कोरोना’तही सर्जनशीलतेला धुमारे..! जुन्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

Coronavirus : ‘कोरोना’तही सर्जनशीलतेला धुमारे..! जुन्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

Next

पुणे : कोरोनामुळे जगाची झोप उडवली असली, तरी सोशल मीडियावर लोकांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले आहेत. कुणी कोरोनावर कविता करतंय, तर कुणी एखादं गाणं तयार करतंय... तर कुणी चक्क जुन्या गाण्यांवर कोरोनाचे शब्द गुंफून रिमिक्सचे व्हिडीओ व्हायरल करतंय... चिंताग्रस्त वातावरणात या कलात्मक निर्मितीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर काही क्षणापुरते का होईना हसू फुलतंय!
‘कोरोना, ‘कोरोना आणि ‘कोरोना’ या चर्चेमधून लोकांना काही काळापुरते का होईना बाहेर काढण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती हे उत्तम माध्यम ठरत आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो’ हे शब्द आपल्या खास शैलीत उच्चारताच नेटिझन्सला आयतेच खाद्य मिळाले आणि अभिव्यक्तीला उधाणच आले.

चालू घडामोडींवर विडंबनात्मक शैलीमध्ये काव्यरचना करण्यात ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा हातखंडा आहे. रामदास आठवले यांच्यावर त्यांना काव्य स्फुरले नसते तरच नवल! आठवले यांच्या ‘गो कोरोना’वर फुटाणे यांनी ‘बाळा गो गो रे’ केलेली कविता व्हायरल झाली. ‘हायकमांड ‘गो’ म्हणताच, जोरजोरात पळतात, पळता पळता अचानक हायकमांडच बदलतात,’ ही कविता वाचून अनेकांच्या ओठावर हसू उमटले.

अगदी ‘बाहुबली’मध्ये प्रभासच्या जागी आठवले यांचा चेहरा मॉर्फ करून ‘गो कोरोना गो’चा व्हिडीओ असो किंवा जगभरात कोरोनाची धास्ती अमेरिकेच्या अध्यक्षांनीदेखील किती घेतली आहे, हे दर्शविणारा व्हिडीओ असो या क्लिप्सनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला.

चित्रपटसृष्टीतील ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांनीही या आजारासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, हा व्हिडीओ टिष्ट्वट टाकल्यानंतर रेल्वे मंत्रालयानेदेखील हा व्हिडीओ शेअर केला.
 

Web Title: Coronavirus: 'Corona' also blends creativity! Video of old songs goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.