Corona Yirus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार १७७ नवीन रुग्णांची वाढ ; १ हजार १४२ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 00:20 IST2020-08-15T00:16:27+5:302020-08-15T00:20:35+5:30
आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ४८ हजार २६२ वर

Corona Yirus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार १७७ नवीन रुग्णांची वाढ ; १ हजार १४२ कोरोनामुक्त
पुणे : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार १७७ कोरोनाबधितांची वाढ झाली असून, १ हजार १४२ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १५ जण पुण्याबाहेरील रहिवासी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७५० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४६७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर २ हजार ४५२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.आजपर्यंत शहरात एकूण ७१ हजार ५०३ जण कोरोनाबाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ७२० इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५५ हजार १०० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ६८३ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ६७३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ४८ हजार २६२ वर गेला आहे़