Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 22:59 IST2021-05-05T22:57:45+5:302021-05-05T22:59:21+5:30
त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करणे गरजेचे असल्याचेही टास्क फोर्सच्या सदस्याने व्यक्त केले मत...

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत
पुणे : तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकत असल्याचं मत राज्याच्या टास्क फोर्स च्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. 'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स'तर्फे बुधवारी ( दि. ५) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना टास्क फोर्स चे सदस्य म्हणाले " तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेमध्ये सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. याचे कारण म्हणजे लहान मुलांसाठी लसीकरण करण्यासाठी कोणतीही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. पुढचा टप्प्यात या मुलांमध्ये कोरोना जास्त पसरू शकतो. सध्याचा लसीकरणाचा पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. तसेच जरी लस उपलब्ध झाली तरी देखील मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे वेळ लागू शकतो. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेची तयारी करणे गरजेचे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
या बरोबरच गर्दीत जाताना दोन मास्क तर कमी लोकांमध्ये असताना मास्क पुरेसा असल्याचं मत देखील यावेळी व्यक्त करण्यात आले..तसेच घरात जर घरकामगार येत असतील तर मास्क परिधान करावा, अशी सूचना देखील टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली.
दरम्यान,मंत्री आदित्य ठाकरेंनी आपण अजिबात हलगर्जीपणा करता कामा नये असे मत व्यक्त केले.ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावला गेला आहे तसाच हळू हळू अनलॉक करण्यात येईल.अर्थात हे कोरोनाची ही लाट ओसरल्यानंतर असे ही ते म्हणाले.तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार असायला हवं असही मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीत पुढचा काही महिन्यांमध्ये काय चित्र असेल तसेच पुढचा लाटेचा सामना कसा करायचा याविषयी चर्चा झाल्याचं मराठा चेंबर चे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले.