शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
Radhika Yadav : "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
3
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
4
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
5
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
6
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग
7
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
8
Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
9
भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
10
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
11
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
12
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
13
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
14
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
15
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
16
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
17
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
18
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
19
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
20
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!

Corona virus : पुण्यातील मार्केटयार्ड शुक्रवारपासून अनिश्चित काळापर्यंत राहणार बंद; भुसार बाजार सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 11:09 IST

शुक्रवार १० एप्रिल २०२० पासून फळे, भाजीपाला, कांदा -बटाटा व केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीकडून आडते असोसिएशनला पत्राद्वारे कळविले परिस्थिती आटोक्यात येत नाही़ तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत.

पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड उद्या शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशन तसेच कामगार युनियन, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटना यांनी घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड व त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील केला असून कर्फ्यु सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही़ तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवार १० एप्रिल २०२० पासून फळे, भाजीपाला, कांदा -बटाटा व केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आडते असोसिएशनला पत्राद्वारे कळविले असल्याचे आडते असोसिएशनने म्हटले आहे.           मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यु लावण्यात आला आहे. फक्त मार्केट यार्डमध्ये बाहेरुन मालाची आवक होत आहे. व घाऊक व्यापार्‍यांनाच येथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. बाहेरुन आलेले ट्रक, टेम्पो यांना गटा गटाने आत प्रवेश दिला जात होता. मार्केटयार्ड बंद होणार आहे. तसेच पुणे शहरातील कर्फ्यु टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बुधवारी सांगितले होते. याच वेळी त्यांनी दहा दिवसांचे सामान भरुन ठेवा, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर आता मार्केटयार्डही बंद झाल्याने शहरात जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सयंम पाळण्याची गरज आहे. किराणा मालाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी अनेकदा दिसून येते. तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. फक्त भुसार बाजार सुरु मार्केटयार्डमधील कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे, केळी बाजार बंद राहणार आहे. फक्त भुसार बाजार सुरु राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीने कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डbusinessव्यवसायFarmerशेतकरीvegetableभाज्याfruitsफळेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस