Corona virus : पुण्यात पोलीस कर्मचार्‍यासह पत्नीला कोरोनाची लागण; पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:17 PM2020-04-18T12:17:10+5:302020-04-18T12:26:41+5:30

चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

Corona virus : Police and her wife is Corona infected in Pune | Corona virus : पुण्यात पोलीस कर्मचार्‍यासह पत्नीला कोरोनाची लागण; पोलीस दलात खळबळ

Corona virus : पुण्यात पोलीस कर्मचार्‍यासह पत्नीला कोरोनाची लागण; पोलीस दलात खळबळ

Next
ठळक मुद्देफरासखानाच्या इमारतीत जवळपास ३०० पोलीस अधिकारी, कर्मचारी करतात काम संबंधित सर्वांचे वैद्यकीय तपासणी करून त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करण्यात येणारपिंपरीतील वायसीएममध्ये उपचार सुरु

पुणे : लोकांनी घरी रहावे, कोरोनापासून दूर रहावे, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी यांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात काम करणारा पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी रात्री निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएममध्ये उपचार करण्यात येत आहेत. 
मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हा पोलीस कर्मचारी पोलिसांच्या व्हॅनवर चालक म्हणून काम करत होते. त्यामुळे गेल्या १५ दिवसात त्यांचा अनेकांशी संबंध आला होता. मध्य वस्तीतील पोलीस ठाण्याच्या इमारतीत जवळपास ३०० पोलीस अधिकारी, कर्मचारी काम करतात. या शिवाय परिमंडळ १ मधील विविध पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी येथे येत असतात. त्यामुळे या पोलीस कर्मचार्‍याचा कोणाकोणाशी संपर्क आला. त्या सर्वाची माहिती घेतली जात आहे. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. 
यापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याला अनेक दिवस ताप असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता़ सुदैवाने त्यांची तपासणी केल्यावर ती निगेटिव्ह आली होती.
.......

चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत...
चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्याच्या पत्नीचे रिपोर्टही शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. तर, शहरातील 54 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

पिंपरी चिंचवडमहापालिकेने 126 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा आले आहेत.  त्यात 42 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  त्याचबरोबर  एका 38 वर्षीय  महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही च-होली परिसरातील आहेत. त्यांना कोरोनाची कशी लागण झाली, कोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. 


 दहा दिवसांत 33 नवीन रुग्ण 
पिंपरी चिंचवड शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. आज दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील दहा दिवसात तब्बल 33 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

Web Title: Corona virus : Police and her wife is Corona infected in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.