Corona virus : अरे बापरे ! पुणे जिल्ह्यात ८२० नवीन कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १६८५१ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:00 PM2020-06-23T23:00:59+5:302020-06-23T23:15:49+5:30

पुणे शहरातील रुग्णसंख्या गेली 13 हजारांच्या पुढे

Corona virus : Oh my god! 820 new corona infected in Pune district, total number of patients at 16851 | Corona virus : अरे बापरे ! पुणे जिल्ह्यात ८२० नवीन कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १६८५१ वर

Corona virus : अरे बापरे ! पुणे जिल्ह्यात ८२० नवीन कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १६८५१ वर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आत्तापर्यंत 671 लोकांचा मृत्यूदिवसभरात ४६७ रुग्ण वाढ : २७७ रुग्ण अत्यवस्थ, १० जणांचा मृत्यू

पुणे : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होत असताना मंगळवार (दि.२३) रोजी एकाच दिवसांत तब्बल ८२० रुग्णांची वाढ झाली. यात पुणे शहरात सोबत पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तसेच कॅन्टोनमेन्ट आणि ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढले आहेत. दरम्यान मंगळवारी १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून, आतापर्यंत एकूण ६७१ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 
पुणे जिल्ह्यात कोरोनांच्या चाचण्यांमध्ये मोठी वाढ केली आहे. पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्यात दररोज सरासरी १५०० ते २ हजार चाचण्या केल्या जातात होत्या. परंतु आता हे प्रमाण वाढविण्यात आले असून, दररोज किमान ३ हजार रुग्णांची चाचणी केली जात आहेत. यामुळे आता कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. यात प्रशासनाकडून कन्टमेन्ट झोन वर अधिक लक्ष देण्यात आले आहे, परंतु गेल्या काही दिवसांत कन्टमेन्ट झोनच्या बाहेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दिसत आहे. हे प्रमाण ४० टक्क्यांच्या घरात पोहचले आहे. ही बाब अधिक धोकादायक असून, भविष्यात यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावल्या शिवाय घराबाहेर पडू नये, नियमित हात साबणाने स्वच्छ धुऊने अत्यंत आवश्यक आहे. परंतु अनेक लोकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासना सोबत नागरिकांनी देखील पुढाकार घेण्याची गरज आहे. 
------ 

शहरातील रुग्णसंख्या गेली १३ हजारांच्या पुढे
पुणे :  शहरात दिवसभरात ४६७ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १३ हजार १५३ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ९४५ झाली आहे. विविध रुग्णालयातील २७७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ४ हजार ६८० असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
मंगळवारी रात्री साडे नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ४६७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १३, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ३५० तर खासगी रुग्णालयांमध्ये १०४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात मंगळवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५२८ झाली आहे. दिवसभरात एकूण २७३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २१५ रुग्ण, ससूनमधील ०६ तर  खासगी रुग्णालयांमधील ५२ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ९४५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ६८० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४०२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९३ हजार ८०८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ८२६ ससून रुग्णालयात ४३६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार ४१८ रुग्ण उपचार घेत आहेत.


एकूण बाधित रूग्ण : १६८५१
पुणे शहर : १३२२९
पिंपरी चिंचवड : २२२७
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १३९५
मृत्यु : ६७१

Web Title: Corona virus : Oh my god! 820 new corona infected in Pune district, total number of patients at 16851

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.