शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : मानवाच्या क्वारंटाईनचा पक्षी;प्राण्यांवर चांगला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 07:00 IST

माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे...

ठळक मुद्देकॅमेऱ्यांनी टिपलेले वास्तव: पाणवठ्यांवरची वाढली संख्या कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा

पुणे: जगाला ग्रासणाऱ्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी माणूस एकमेकांपासून विलग (क्वारंटाईन) होऊन बंदीवासात जातो आहे, पण त्याच्या या क्वारंटाईनचा पक्षी व प्राणीजगतावर मात्र चांगला परिणाम झाला आहे. पाणवठ्यांवरील त्यांच्या संख्येत वाढ तर होऊ लागलीच आहे, शिवाय काही दुर्मिळ पक्षी, प्राण्यांचेही तिथे दर्शन होऊ लागले आहे.जेजूरीजवळ पिंगोरी गावात दाट झाडीचा एक भला थोरला डोंगर आहे. तिथे वन विभागाच्या साह्याने इला फौडेशन काम करते. पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे त्याचे संचालक आहेत. डोंगराच्या काही भागातील पाणवठ्यांवर फौडेशनच्या वतीने कँमेरे लावले आहेत. त्यांच्यासमोर दिवसारात्री, कधीही काहीही हालचाल झाली की त्याचे छायाचित्र टिपले जाते. एकदोन आठवड्यात ७० हजार वगैरे छायाचित्रे हे कॅमेरे टिपतात. राहूल लोणकर, राजकूमार पवार, ऊमाजी खोमणे, डॉ. ओंकार सुमंत हे आणखी काहीजण फौडेंशनचे काम पाहतात.या कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्र खोटे बोलत नाहीत असे सांगून पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे म्हणाले, मागील ४ वर्ष आणि लॉकडाऊनचे गेले १५ दिवस या काळातील छायाचित्र पाहिली आणि याचा शोध लागला. एरवी या पाणवठ्यांवर माणसांचीही वर्दळ असते. त्यावेळी म्हणजे गेली ४ वर्षे आम्हाला फक्त बुलबूल, साळुंकी, घरकावळा, डोमकावळा, होला, शिंपी, शिंजीर असे पक्षी पाणवठ्यावर दिसायचे. मागच्या पंधरा दिवसात झालेला बदल म्हणजे आता फँटेल, नर्तक, स्वर्गीय नर्तक, निलांग असे अनेक दुर्मिळ पक्षी दिसू लागलेत. या आणि एकूणच सर्व पक्षांच्या पाणवठ्यावर यायच्या संख्येतही वाढ झाली. दिवसातून तीन वेळा आता ते येतात, पुर्वी एकदाच येत.कँमेरा रात्रीची छायाछित्रही इन्फ्रा रेड किरणांमध्ये टिपतो अशी माहिती देऊन डॉ. पांडे म्हणाले, सस्तन प्राण्यांमध्येही हे बदल झाले आहेत. मुंगूस, घोरपड, तरस, चिंकारा, रानमाजंर असे प्राणी पूर्वी दिसत. आता चौसिंगा, भेकर, खोकड, कोल्हा, साळींदर, रानडुक्कर, ऊदमांजर हे प्राणी दिसत आहेत.माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे. आपल्याला १५ दिवस क्वारंटाईन केले तळ त्याचा त्रास होतोय, त्यांना किती झाला असेल याचा विचार करून कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा अशी भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.................बिबट्या हा अतिशय सावध प्राणी आहे, त्याची बुद्धीही ( संवेदना) तीक्ष्ण आहे. त्यामुळे धोका असेल तिथे तो फिरकतही नाही. मागील पंधरा दिवसात मात्र एक बिबट्या सहकुटूंब सहपरिवार पाणवठ्यावर निवांत फेरी मारत असतो, असे डॉ. पांडे म्हणालै. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNatureनिसर्ग