शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात गुरुवारी आजवरची सर्वाधिक १८१२ कोरोना रूग्णांची वाढ; एकूण संख्या ३१ हजार ८८४

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:05 AM

दिवसभरात बरे झालेल्या ७६४ जणांना घरी सोडण्यात आले घरी

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ५३६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी आजवरची सर्वाधिक १ हजार ८१२ रूग्णांची भर पडली असून यामध्ये रॅपिड अँटिजेन किटद्वारे निष्पन्न झालेल्या ४८५ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३१ हजार ८८४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ७६४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५३६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ६४४ झाली आहे.गुरूवारी रात्री साडे दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १३२७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात २६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १११८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १८३ रुग्ण दाखल झाले आहेत. तर, पालिकेच्या विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणीत निष्पन्न झालेले ४८५ रुग्ण असे एकूण १८१२ रुग्ण वाढले आहेत.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. दिवसभरात १७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ९०६ झाली आहे. दिवसभरात एकूण ७६४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ५८० रुग्ण, ससूनमधील ०७ तर  खासगी रुग्णालयांमधील १७७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २० हजार ३३४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १० हजार ६४४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६१३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ८४ हजार ६९७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे २ हजार ९६९ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही मिळून एकाच दिवसात ६ हजार ५८२ जणांची तपासणी दिवसभरात करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका