शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराच्या सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू; राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:03 IST

शहरातील बहुतांश सांडपाणी प्रकल्पांतील पाण्यात मे महिन्यापासून या विषाणूचे अंश मोठ्या संख्येने आढळून येत आहेत

पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीतून शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचे अंश आढळून आले आहेत. दि. २२ एप्रिल रोजी शहरातील केवळ एका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्यात कोरोना विषाणूचे अंश आढळून आले होते. मात्र, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने (एनसीएल) मे महिन्यात केलेल्या तपासण्यांमध्ये कोरोना विषाणूचे अंश आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील बहुतांश सांडपाणी प्रकल्पांतील पाण्यात मे महिन्यापासून या विषाणूचे अंश मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

यापूर्वी याच प्रकल्पामार्फत ओमिक्रॉन आणि त्याच्या उपप्रकारांमुळे संसर्गात झालेली वाढ निदर्शनास आली होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व पुणे नॉलेज क्लस्टरच्या वतीने काेरोना काळात ऑगस्ट २०२१ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पामार्फत शहरातील सुमारे दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील पाण्याची नियमित तपासणी केली जाते. प्रत्येक आठवड्याला सांडपाणी नमुने तपासण्यात येतात. या तपासणीत एप्रिलमध्ये केवळ एका प्रकल्पातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचे अंश आढळून आले होते. त्यानंतर दि. ६ मेपासून सर्व दहा सांडपाणी प्रकल्पांतील पाण्यात कोरोना विषाणूचे अंश आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. साथरोगांची पूर्वसूचना मिळण्यासाठी सांडपाणी सर्वेक्षण प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे. सांडपाणी तपासणीत आढळलेल्या निष्कर्षांची माहिती ‘एनसीएल’कडून आरोग्य विभागाला दिली जात असल्याने तातडीने उपाययोजना करणे शक्य झाले आहे.

विषाणूंच्या अंशांच्या प्रमाणातून समजते संसर्गाची तीव्रता

शहरातील मैलामिश्रित सांडपाण्यात आजाराचा संसर्ग झालेल्या नागरिकांमधील मृत विषाणूंचे अंश मिसळलेले असतात. अशा पाण्याची तपासणी केल्यास त्यातील विषाणूंचे अंश आढळून येतात. तपासणीअंती सांडपाण्यात एखाद्या विषाणूच्या अंशाचे प्रमाण किती आहे, यावर त्या संसर्गाचा प्रसार आणि तीव्रता लक्षात येते. एखाद्या परिसरातील सांडपाण्यात विषाणूचे प्रमाण जास्त आढळल्यास त्या भागात त्या विषाणूचा संसर्ग किती तीव्र आहे, याचा निष्कर्ष काढला जातो.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलWaterपाणीpollutionप्रदूषण