शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 2:51 PM

कोरोनाचा साखर कारखान्यांना फटका

ठळक मुद्देसध्या राज्यातील साखर कारखाने सुरू : ऊस तोड कामगारांनी काम सोडून धरला घरचा रस्ताकारखाने देणार एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य

सोमेश्वरनगर : कोरोनाच्या धास्तीने ऊसतोडणी कामगार आता साखर कारखान्यावर थांबण्यास तयार नसून त्यांनी काम सोडून गावाकडचा रस्ता धरला आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सहा ते सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कारखान्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकºयांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे.जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातील साखर कारखानदारीला कवेत घेण्यास सुरवात केली आहे. सध्या राज्यातील साखर कारखाने सुरू होते. मात्र, ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडण्यास मनाई केल्याने आता ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेचा कणा मोडण्याचे चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यात बारा कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत. त्याचे लोण महाराष्ट्रभर पसरले असून ऊस तोडणी कामगारांनी एल्गार केला. कारखाने बंद करा आम्हाला आमच्या गावाला जाऊद्या असे म्हणत बंद पुकारला आहे.पुणे जिल्ह्यात अजून सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, संत तुकाराम आणि भीमाशंकर हे साखर कारखाने सुरू आहेत. या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून सहा ते सात लाख टनाच्या आसपास ऊस शिल्लक असून ऊसतोडणी कामगारांच्या बंद मुले ऊस उत्पादक शेतकºयांचा हजारो एकरांवरील ऊस शिल्लक राहिला तर शेतकºयांचे कंबरडे मोडणार आहे. तर शेतकºयांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. एकीकडे साखर आयुक्तांनी राज्यातील साखर कारखाने सुरू ठेवावेत असे आदेश दिले आतांनाही जर ऊसतोडणी कामगार जर निघूनच गेले तर शिल्लक उसाची विल्हेवाट कशी लावणार असा प्रश्न साखर कारखान्यांना भेडसावत आहे.साखर कारखाना बंद करा, आणि आम्हाला आमच्या गावाला सोडा असे म्हणत ऊसतोडणी कामगारांनी ऊस वजन काट्यावरच आंदोलने सुरू केले आहे. शेकडो ऊस तोडणी कामगार व महिला कामगार हे आता उघडपणे रस्त्यावर उतरत कारखाने बंद करा असा नारा देत आहेत.याबाबत ऊसतोडणी कामगार म्हणाले की, रस्त्याने माणूस दिसेना, तुम्ही तुमच्या घरात आरामात बसला आहे, बागायतदार साधा उसाच्या फडात पण येत नाही, आमच्या गावातही म्हतारी माणसं, लहान लहान लेकरं आहेत, आम्हाला त्यांच्या जवळ जायचं आहे, या आजारामुळे सगळंच महागले आहे, तेल महागले, शेंगदाणे महागले आम्ही जगणार कसे शेजारी साखर कारखाना असून आम्हाला ४५ रुपये किलोने साखर खावी लागते तर गावाला आमची लहान लहान मुले आहेत म्हतारी माणसे आहेत, आम्हाला त्याच्याकडे जाउंदे अशी विनवणी केली.----------------कारखाने देणार एक महिना पुरेल एवढे अन्नधान्यकारखान्याच्या कार्यक्षेत्रात उभा असलेला ऊस संपवण्यासाठी व ऊस तोडणी कामगारांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य देण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे....................गेटकेन चा फटकाअनेक कारखाने ऊसाचे जास्त गाळप करण्यासाठी शेतकºयांचा ऊस पाठीमागे ठेऊन गेटकेन उसाचे गाळप करतात, कारखान्याच्या मालकाचा ऊस ठेवायचा आणि परक्याचा ऊस गाळायचा अशी काही कारखान्यांची मानसिकता आहे. आज हीच मानसिकता सभासदांच्या मुळावर उठली आहे.....................उस उत्पादक शेतकरी धास्तावलाराज्यातील ऊसतोडणी कामगारांनी  बंदचा एल्गार पुकारल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी  धास्तावला आहे. एकतर दोन महिन्यांपूर्वी जाणारा ऊस अजून शेतातच उभा, त्यात वजन घटले आहे आता ऊसतोडणी कामगार निघूनच गेला तर काय करणार, कसे उसाचे गाळप होणार या चिंतेने शेतक?्याला ग्रासले आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीIndapurइंदापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार