शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Corona virus: पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' ची कडक अंमलबजावणी करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश : राजेश टोपे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:58 PM

प्रत्येकाची टेस्ट करता येणार नाही. प्रोटोकॉल नुसारच टेस्ट करावी लागणार आहे.  

ठळक मुद्देहोम क्वारन्टाईन केलेल्या प्रवाशाने केवळ घरीच राहणे आवश्यक

पुणे: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४३ झाली असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर पुण्यातसुध्दा वर्क फ्रॉम होम ची कडक अंमलबजावणी करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित होते.टोपे म्हणाले, पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होते आहे.  एनआयव्हीमध्ये दिवसाला ४०० संशयितांचे अहवाल तपासले जात आहे.पुण्यात क्वारन्टाईनमध्ये साधारण 830 लोक राहू शकतील इतकी जागा तयार करण्यात आली आहे. तसेच 100 रुग्णांसाठी नायडू वॉर्ड आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 60 बेडचा आयसोल्युशन वॉर्ड देखील उपलब्ध केला आहे. तसेच पुण्यातील औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या यांसह खासगी संस्थांमध्ये देखील वर्क फ्रॉम होम ची कडक अंमलबजावणी लवकर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. पुण्यात 10 खासगी रुग्णलयात आयसोल्युशन वॉॅर्ड तयार करण्यात आले आहेत. पिंपरी मध्ये 8 खासगी रुग्णालयात आयसोल्युशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे.  टोपे म्हणाले, 42 रुग्णांपैकी 9 लोकं हे लोकल ट्रान्समिशन मुळे कोरोना बाधित आहे. तसेच कोरोना लक्षणे असलेल्या प्रत्येक नागरिकाची आपण तपासणी करत आहोत. परंतु, कोणीही येऊन तपासणी करा म्हंटल्यास तसे करता येणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी महाराष्ट्रात योग्य पद्धतीने काम सुरु असल्याचे ते म्हणाले.गर्दी कमी न झाल्यास मुंबई लोकल बंद करावी लागणार आहे. खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यास परवानगी दिली असली तरी त्याचा खर्च सरकार करणार नाही. प्रत्येकाची टेस्ट करता येणार नाही. प्रोटोकॉल नुसारच टेस्ट करावी लागणार आहे.  जगातील ७ कोरोनाबधित देशातुन येणाऱ्या प्रवाशांना देखील विलगीकरण  करुन देण्याबाबत केंद्राकडे मागणी केली आहे.  होम क्वारन्टाईन केलेल्या प्रवाशाने केवळ घरीच राहणे आवश्यक आहे.- 

 

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMIDCएमआयडीसीEmployeeकर्मचारी