Corona virus : पुणे विभागात एका दिवसांत 214 रूग्ण बरे होऊन घरी परतले; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 365

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:10 PM2020-05-11T20:10:41+5:302020-05-11T20:11:18+5:30

पुणे जिल्हयातील 2 हजार 926 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 139 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत

Corona virus : The department cured 214 patients and returned home in one day; corona patient number on 3 thousand 365 | Corona virus : पुणे विभागात एका दिवसांत 214 रूग्ण बरे होऊन घरी परतले; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 365

Corona virus : पुणे विभागात एका दिवसांत 214 रूग्ण बरे होऊन घरी परतले; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 365

Next
ठळक मुद्देविभागात नव्याने 123 पॉझिटिव्ह रूग्णांची भर ; तर 7 मृत्यू 

पुणे : विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होऊन घरी जाणा-या रूग्णांची संख्या देखील चांगली वाढली आहे. यामध्ये सोमवारी (दि.11) रोजी विभागात एका दिवशी 214 रूग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे विभागात आतापर्यंत 1 हजार 237 रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.तर सोमवारी नव्याने 123 रूग्णांची वाढ झाली असून, 7 रूग्णांचा मृत्यू झाला. नवीन रूग्ण वाढीच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण सोमवारी दुपट्ट होते. रूग्ण वाढीचा वेग नियंत्रणात राहिला आणि बरे होणारे रूग्ण वाढत राहिल्यास लवकरच कोरोनावर मात करू शकू असा विश्वास निर्माण होऊ लागला आहे. 
विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
    यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 926 बाधीत रुग्ण असून 1 हजार 139 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 
    सातारा जिल्हयातील 119 कोरोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 264 कोरोना बाधीत रुग्ण असून 41 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 हजार 64 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32 हजार 366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 671 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 28 हजार 969 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     
------

Web Title: Corona virus : The department cured 214 patients and returned home in one day; corona patient number on 3 thousand 365

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.