शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona virus ; कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, 'अग्निपरिक्षा पार पडली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 09:58 IST

कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

ठळक मुद्देपुण्यात कोरोना प्रादुर्भावातून पूर्ण बरा झालेल्या रुग्णाच्या भावना लोकांनी घरीच राहण्याचा 'लोकमत'च्या माध्यमातून दिला सल्ला

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : गेले १४ दिवस म्हणजे अग्निपरिक्षाच होती. बंदिस्त जीवन, कोरोनाबाधित असल्याचा बसलेला शिक्का आणि प्रचंड मानसिक उलाघाल! पण 'हेही दिवस जातील' याच विश्वासाने आणि कुटुंबीय, नातेवाईक यांच्या खंबीर पाठिंब्याने हा लढा जिंकलो. कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

दुबईहून प्रवास करून आल्यानंतर ताप, खोकला अशी लक्षणे दिसू लागल्याने पुण्यातील व्यक्तीने डॉक्टरांकडे धाव घेतली. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संकट कोसळले. त्यापाठोपाठ पत्नी आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तिघांनाही नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण क्षात दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या मुलालाही विलग करण्यात आले. पहिले दोन दिवस प्रचंड घबराटीचे होते, असे रुग्णाने सांगितले.ते म्हणाले, डॉक्टरांची तत्परता, सकारात्मकता आणि आपल्याला लढायचे आहे, बरे व्हायचे आहे, ही जिद्द यामुळे आयुष्यातील सगळ्यात मोठया संकटातून  तारून जाता आले. एकेक दिवस संयमाची परीक्षा घेणारा होता. गेले आठ दिवस आम्हाला तिघांनाही शिंक, खोकला, ताप असा कोणताच त्रास झाला नाही. त्यामुळे मनोधैर्य आणखी वाढले. आता घरी जाणार आहोत. सर्व प्रकारची काळजी घेणार आहोत आणि 14 दिवस होम क्वारंटाईन राहणार आहोत.'शासनाला सहकार्य करामोबाईलवरून, नातेवाईकांकडून कोरोनाबाबत गंभीर होत चाललेली परिस्थिती सातत्याने समजत होती. सध्याचा काळ आपल्या सर्वांचीच परिक्षा पाहणारा आहे. शासन त्यादृष्टीने काम करत आहे. शासनाला पूर्ण सहकार्य करा, घरीच रहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.- कोरोनामुक्त व्यक्ती

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य