Corona virus : चीनमध्ये स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण; भारतातही 'सेल्फ क्वारंटाईन' हाच मौलिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:42 PM2020-04-10T12:42:23+5:302020-04-10T13:06:31+5:30

सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य

Corona virus : Control of the Corona in the china due to self discipline | Corona virus : चीनमध्ये स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण; भारतातही 'सेल्फ क्वारंटाईन' हाच मौलिक उपाय

Corona virus : चीनमध्ये स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण; भारतातही 'सेल्फ क्वारंटाईन' हाच मौलिक उपाय

Next
ठळक मुद्देभारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थितीलॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यतासेल्फ क्वॉरंटाईन हाच मौलिक उपाय

धनाजी कांबळे - 
पुणे : चीनमधून सुरुवात झालेला कोरोनाचा विषाणू जगभर पोचेल असे वाटत नव्हते. मात्र, सरकारने सुरुवातीला काही देशांमधून आपल्या लोकांना मायदेशी आणले. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यातून संसर्गाचे प्रमाणे वाढले. चीनमध्ये मात्र, स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच भारतातही सेल्फ क्वारंटाईन हाच मौलिक उपाय असल्याचे चीनमध्ये वास्तव्याला असलेले भारतीय नागरिक मिलिंद उजळंबकर यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.
कोरोना विषाणू कधी कुठे प्रवेश करेल, याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता देशोदेशी पोहचणाऱ्या या विषाणूचे भारतातही एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही चिंतेची बाब असल्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे आणि सरकारी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण चीनमधील वुहान शहरात साधारण ७५ दिवस लॉकडाऊन होते. या शहरातून बाहेरच्या शहरात विषाणूचा प्रसार होणार नाही, असे कटाक्षाने बघितले. त्यामुळे जवळच असणाऱ्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी आणि तुलनेने नियंत्रणात आहे. आजही हाँगकाँगमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन करण्यात आलेले नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे स्वयंशिस्त आणि स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे हेच यावरचे महत्त्वाचे औषध आहे. चीनमध्ये आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी ज्या ज्या ठिकाणांहून संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे, असे भाजीमार्केट किंवा इतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा आणि काळजी घेतली जात आहे, असे उजळंबकर यांनी सांगितले.
सरकारने एक अ‍ॅप डेव्हलप केले होते. त्याच्या आधारे कुणालाही ६०० स्क्वेर फुटापेक्षा अधिक लांब जाता येत नव्हते. तसे केल्यास तत्काळ सरकारला मेसेज जात होता. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक हे अ‍ॅप तयार करण्यात आले होते. त्यानुसार संशयिताच्या हातात एक पट्टी बांधली जात होती. तसेच त्याच्या मोबाईलमघ्ये हे अ‍ॅप डाउनलोड केले जात. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जवळपास कोणी कोरोनाबाधित असल्यास संबंधिताला त्याची माहिती मिळत होती. तसेच सरकारी आरोग्य यंत्रणेला देखील अलर्ट केले जात होते. त्यामुळे या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

भारतीयांनी काळजी घ्यावी...
आता भारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थिती आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संसगार्तून या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. लॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. सर्वांनी स्वयंशिस्त आणि सेल्फ क्वॉरंटाईनचे महत्त्व लक्षात घेऊन काळजी घ्यावी, असे आवाहनही मिलिंद उजळंबकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Corona virus : Control of the Corona in the china due to self discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.