शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 6:14 PM

लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती..

ठळक मुद्दे पुण्यात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण तर मुंबईत दिवसागणिक १२०० ते १३०० रुग्ण

पुणे : कोरोना नियंत्रणासाठी सरकारी, प्रशासकीय व वैद्यकीय पातळीवर अनेक पावले उचलली जात आहे. पण वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला अटकाव घालण्यात अजूनतरी यश आलेले नाही.गेल्या तीन दिवसांत पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही मुंबईपेक्षा अधिक आहे. ही बाब निश्चितच पुणेकर व प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. 

देशभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर मार्च महिन्यात पुणे शहरात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर रुग्ण वाढीचा आलेख हा चढताच राहिला आहे. या दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे ही संख्या कुठेतरी नियंत्रणात होती. मात्र, 1 जून पासून राज्य सरकार व जिल्हाधिकारी प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.त्यामुळे फिजिकल सुरक्षितता धोक्यात आली. नागरिकांकडुन नियमांचे सातत्याने उल्लंघन होऊ लागले. त्यामुळे पुन्हा प्रशासनाला पुणे व पिंपरी शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावा लागला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहे.यादरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत,महापालिका प्रशासन यांच्यासोबत बैठकांचा धडाका लावला आहे. तसेच वेळप्रसंगी प्रशासनाला कठोर निर्णय घेत कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. 

 पुण्यात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत तर मुंबईत दिवसागणिक १२०० ते १३०० रुग्ण सापडत आहे.गुरुवारी पुणे शहरात तर १८८२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.मुंबईत गुरुवारी १४९८ रुग्ण होते. आजमितीला पुणे शहराची रुग्णसंख्या ३१ हजार ८८४ इतकी आहे. आणि ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत बाधितांची संख्या ९७ हजारांच्या वर गेली असून मृतांची संख्या साडे पाच हजारांच्यावर आहे. त्याच दरम्यान महापालिकेकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत विविध उपाययोजना करण्यात येत होत्या.शहरातील स्वाब टेस्ट वाढवण्यात आल्या होत्या.

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMumbaiमुंबईNavalkishor Ramनवलकिशोर राम