शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

Corona virus : पुण्यातील दुसर्‍या कोरोनाबाधित पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:17 PM

पुणे पोलीस दलातील २२ पोलीस कर्मचार्‍यांना आतापर्यंत कोरोनाची लागण

ठळक मुद्देराज्यात आतापर्यंत १ हजार ३८८ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचार्‍यांचा कोरोना विषाणुची लागण होऊन मृत्यु झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. यापूर्वी एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला आपले प्राणगमवावे लागले होते. पुणे पोलीस दलातील २२ पोलीस कर्मचार्‍यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील किमान ११ जणांनी कोरोनावर मात करुन ते उपचारानंतर आता घरी गेले आहे. त्यातील काही जण आता पुन्हा कोरोना योद्धा म्हणून कामावर परत आले आहेत.समर्थ वाहतूक पोलीस विभागाने कार्यरत असलेल्या व कटेंन्मेंट झोनमध्ये काम करीत असलेल्या या कर्मचार्‍याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे दिसून लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ४२ वर्षाचे हे पोलीस कर्मचारी सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये रहात होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी व ३ मुले असा परिवार आहे. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस निरीक्षकासह ६ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत १ हजार ३८८ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ४२८ पोलिसांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.तर बुधवारपर्यंत राज्यातील १२ पोलिसांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसDeathमृत्यू