शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

By नरेश डोंगरे | Published: May 26, 2024 11:38 PM

सामन्यापूर्वीच दिले होते 'कोलकाता विन'चे संकेत

नागपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये केकेआरच्या बॉलर्सनी एकीकडे हैदराबादच्या चमूला पळता भूई थोडी केली. दुसरीकडे नागपूरसह मध्य भारतातील बुकींच्याही तिजोऱ्यांमध्ये १० ते १५ हजार कोटींची गंगाजळी ओतली. ओपनिंगला ९५-९८ असा भाव देऊन बुकींनी फायनलची ट्रॉफी कोलकाता नाईट रायडरच जिंकेल, असे संकेत दिले होते, हे विशेष !

आयपीएलच नव्हे तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हजारो कोटींची कटिंग करणारे बुकी नागपुरात बसले असल्यामुळे देशातील बुकीबाजारात नागपूरचे नाव अव्वलस्थानी येते. येथील बुकींचे नेटवर्क थेट दुबईत आहे. त्यामुळे देश-विदेशातील बडे बुकी नागपूरच्या बुकींच्या लाईनवर कनेक्ट असतात. यंदाच्या आयपीएलमध्ये ७० लिग मॅॅच खेळवण्यात आल्या. तीन क्वॉर्टरफायनल आणि शेवटची आज झालेली फायनल अशा एकूण ७४ मॅचेस यावेळीच्या आयपीएलमध्ये झाल्या. या सर्व सामन्यांवर नागपूरच्या बुकींनी खास नजर ठेवली होती. कुणी गोव्यातून, कुणी थेट दुबईत बसूनही कटिंग चालविली होती. त्यांनी कधी जित तर कधी हारही पत्करली. मात्र, आजच्या फायनलने अपवाद वगळता सर्वच्या सर्व बुकींचे नशिब फळफळवले.

देश-विदेशातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या साक्षीने आजचा फायनलचा सामना सुरू झाला तेव्हा बुकींनी कोलकाता संघाच्या विजयाला ९५ (१ हजार लावले तर ९५० रुपये मिळतील) असा भाव दिला होता. तर, सनराईजर्स हैदराबादच्या संघाला ९८ (९८० रुपये लावले तर एक हजार रुपये मिळेल) असा भाव दिला होता. अर्थात कोलकाताचे पारडे जड दाखविले असले तरी सामना तुल्यबळ होईल, असेही संकेत दिले होते. त्यामुळे पहिल्या चेंडूपासूनच वेगवेगळ्या लाईनची वेगवेगळी लगवाडीही सटोड्यांनी केली होती. मात्र, कोलकाताच्या बॉलर्सनी हैदराबादच्या फलंदाजांची दाणादाण उडवून त्यांना केवळ ११३ रणमध्येच निपटवले. सामन्याच्या उत्तरार्धात बुकींचे हाैसले कोलकाता संघासारखेच बुलंद झाले. त्यांनी शेवटच्या टप्प्यात कोलकाताला-हैदराबादला क्रमश: केवळ ४-५ पैसे भाव दिला. अर्थात कोलकाताच्या विजयावर एक हजार लावाल तर जिंकल्यानंतर केवळ ४० रुपये मिळतील आणि हैदराबादवर ५० रुपये लावाल तर जिंकल्यानंतर १ हजार रुपये मिळतील, असा टोकाचा भाव दिला होता. शेवटी कोलकाताने अंतिम सामना जिंकून संकेतानुसार बुकींच्या खिशात कोट्यवधींची गंगाजळी ओतली. सर्वच बुकींची दिवाळीआजच्या सामन्यावर नागपूर-मध्य भारतातील एखाद-दुसऱ्या बुकीचा अपवाद वगळता सर्वच बुकी कोट्यवधींनी फायद्यात राहिले आहे. आजच्या एकट्या फायनल मॅचवर नागपुरातून संचालित होणाऱ्या सट्टा बाजारात एकूण लगवाडी-खयवाडी १० ते १५ हजार करोडच्यावर होती, असेही बुकीबाजारातील सूत्रांचे सांगणे आहे. ९९ टक्के बुकींनी कोट्यवधी जिंकल्याने सर्वच बुकींच्या घरी पुढचे काही दिवस दिवाळीचा माहाैल राहणार असल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे.

टॅग्स :Kolkata Knight Ridersकोलकाता नाईट रायडर्सIPLआयपीएल २०२४